Sambhajinagar : एकनाथ नगरातील म्हाडावासीयांचे गृहनिर्माण मंत्र्यांना साकडे; बघा कोण काय म्हणाले?

Atul Save
Atul SaveTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : एकनाथ नगर येथील ९६ गाळे अत्यल्प उत्पन्न योजनेतील इमारत क्रमांक ३१, ३२, ३३, ३४ या धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी व पुनर्बांधणीसाठी म्हाडावासीयांनी थेट मुंबईत जाऊन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची भेट घेतली. दरम्यान या इमारतीच्या आजुबाजुला असलेली संलग्न जागा सोसायटीला विनाशुल्क द्यावी, इमारतीचा खाजगी विकासकाकडून पुनर्विकास करावयाचा असल्याने म्हाडाकडून घेतलेल्या शेअरींग व प्रिमियमची किंमत कमी करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. दरम्यान सावे यांनी काम करून देण्याबाबत येथील सोसायटीधारकांना आश्वासन दिले आहे. आता या आश्वासनाकडे टेंडरनामाचे लक्ष असेल. 

Atul Save
गुजरातच्या धर्तीवर मराठवाड्यातील 34 हजार कोटींचा 'हा' महत्त्वाचा प्रकल्प कधी लागणार मार्गी?

छत्रपती संभाजीनगर शहरातील उस्मानपुरा परिसरात शहर भुमापण क्रमांक १३६२३ येथे १९७९-८० च्या दरम्यान ९६ गाळे अंत्यल्प उत्पन्न गट योजनेंतर्गत अनुक्रमे ३१, ३२, ३३, व ३४ आदी चार इमारतींचे बांधकाम करण्यात आले होते. सदर इमारतींची अत्यंत जीर्ण अवस्था झाली आहे. इमारतींची पडझड सुरू आहे.‌त्यामुळे सदर इमारतींचा पुनर्विकास करण्यात यावा म्हणून सोसायटीधारकांनी म्हाडा कार्यालयाकडे २०१५ पासून पाठपुरावा सुरू केला आहे. म्हाडाने सदर इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी प्रथम सोसायटीकडून २० मे २०१५ रोजी अभिहस्तांतरण करून घेतले.‌ त्यानंतर १४ ऑक्टोबर २०१५ रोजी रिन्हीवल ऑफ लिज ३१ मार्च २००९ पासून पुढे ३० वर्षांपर्यंत करून दिले.‌ यावेळी सोसायटीच्या इमारतीला एकून जागा १०७१.५१ चौ.मी. अर्थात ११५२९.४४७६ चौरस फुट एवढी जागा देण्यात आली होती असे असताना म्हाडाने सोसायटीला देण्यात आलेली जागा नोंदणीकृत जागेबाबत खरेदीखत व भाडे करारनामा चुकीचा झाल्याचे म्हणत सोसायटीधारकांना दुरूस्त करून घेण्याबाबत २९ मे २०२४ रोजी तगादा लावला.

त्यानंतर सोसायटीधारकांनी १४ जुन २०२४ रोजी दुरूस्ती करून दिली.‌मात्र यात आता म्हाडाने पूर्वीच्या खरेदीखत व भाडे करारनामात १०७१.५१ चौ.मी.दिलेली असताना त्या ऐवजी आता ४९१.२१२ चौ.मी.जागा दिली. म्हणजेच ५२८५.४४११२ चौ.फुट तर इमारतीचा विकास करण्यासाठी म्हाडाने १०८१.१२ चौ.मी.एवढी जागा दिली. म्हणजेच ११६३२.८५१२ चौ.फुट जागा दिली. परंतु खरेदीखत व भाडे करारनामात फक्त ४९१.२१२ चौ.मी. अर्थात ५२८५.४४१२ चौ.फुट जागेचाच करून दिला. यात म्हाडाने ५८९.९०८ चौ.मी. म्हणजेच ५९० चौ.फुट च्या जागेचे सोसायटीने म्हाडास आजच्या रेडिरेकनर दराप्रमाणे पैसे भरून इमारतीच्या आजुबाजुला असलेली ५९० चौ.मी. जागा विकत घ्यावी व नंतरच इमारतीचा पुनर्विकास करावा असे म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता व वास्तुशास्त्रज्ञांनी सांगितले.त्यात ५९० चौ.मी.अर्थात ६३१३ चौ.फुट इमारतीला लागुन असलेली जागा विकत घ्यावी असे म्हणत म्हाडाने सोसायटीला चांगलाच धक्का दिला.

Atul Save
Sambhajinagar : एकनाथ नगरातील धोकादायक इमारतीच्या पुनर्विकासाकडे म्हाडाचा कानाडोळा; जबाबदार कोण?

काय आहेत सोसायटीतील गाळेधारकांच्या मागण्या

- इमारतीच्या आजुबाजुला असलेली सलग जागा ही पुनर्विकास करण्यासाठी म्हाडाने निःशुल्क द्यावी.पुनर्विकास करताना जी शेअरींग व प्रिमियमची परिगणना करतांना त्यात सुट द्यावी.

- इमारत क्रमांक - ३३ ची जागा १०८१.१२ चौ.मी. - ४९१.२१२ = ५९०.९० चौ.मी. ही जागा इमारतीची सलग असल्याने तिचे अधिमुल्य पैसे न घेता विनामुल्य सोसायटीला देण्यात यावी.

- जर इमारतीच्या आजुबाजुला असलेली संलग्न जागा विनामुल्य देता येत नसेल तर म्हाडाने १९७९-८० च्या दरम्यान बांधकाम केले होते. त्यावेळेसच्या रेडीरेकनर दराप्रमाणे पैसे घ्यावेत अन्यथा सन - २०१५ प्रमाणे घ्यावेत.

- म्हाडाचे शेअरिंग व प्रिमियम जास्तीचे असल्याने खाजगी विकासक पुनर्विकास करण्यासाठी तयार होत नाहीत. सदर योजना ही अत्यल्प उत्पन्न गटाची असल्याने सुट द्यावी. कमीत कमी हिस्सा व अधिमुल्य घ्यावे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com