Sambhajinagar : महामार्गावरील 613 कोटीच्या दुरूस्तीनंतरही खड्डेच..

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सातारा परिसरातील नव्या बीड बायपास रोडचे (New Beed Bypass) काम नोव्हेंबर २०२१ मध्ये पूर्ण करण्यात आले. त्यानंतर वर्षभरातच अनेक ठिकाणी उड्डाणपुलाखालचे जोड रस्ते आणि भुयारी मार्गाखाली भगदाड पडायला सुरूवात झाली. 'टेंडरनामा'ने वृत्तमालिका प्रकाशित केल्यानंतर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरण (NHAI)ने खराब डांबरी रस्ते काढून त्याठिकाणी काँक्रिटीकरण करण्याचा दावा केला होता. मात्र, ठेकेदाराने याकामात देखील हातचलाखी केल्याने दुरूस्तीनंतरही खड्डेमेळा कायम आहे. नुकतीच आडगाव फाटा येथे ट्रकचे चाक खड्ड्यात अडकून टायर फुटल्याची घटना घडली. या पार्श्वभुमीवर प्रतिनिधीने रविवारी आडगाव फाटा ते करोडी या तब्बल दोन्ही बाजुने ६० किमी रस्त्याची पाहणी केली असता खोलगट भागात अनेक ठिकाणी रस्ता खचल्याचे दिसले. त्यामुळे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी केंद्रीय पथक पाठवून या रस्त्याची पाहणी करून बांधकामाची चौकशी करतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Sambhajinagar
राज्यातील 88 हौसिंग प्रोजेक्ट रद्दचा प्रस्ताव; सर्वाधिक पुण्यात

शहरातील जुना बीड बायपास हा दोन पदरी धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरच होता. मात्र या मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी हा मार्ग शहराबाहेरून म्हणजे आडगाव ते करोडी असा ३०  किलोमीटर लांबीचा केला गेला. दरम्यान, दोन वर्षापूर्वी या मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले व तो वाहतुकीसाठी खुला केला गेला. काम पूर्ण झाल्यानंतर वर्षभरातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी ऑनलाईन उद्घाटन केल्यानंतर आडगाव ते करोडी ते हतनुर टोलनाका असा ६० किमी लांबीच्या या महामार्गावर आडगाव, गांधेली, देवळाई, सातारा, कांचनवाडी, वळदगाव, करोडी, वाळूज , तिसगाव व माळीवाडा या ठिकाणी  खोलगट भागात हा रस्ता खचला गेला. त्यामुळे ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर 'टेंडरनामा'ने प्रहार करताच एनएचएआयने ठेकेदाराला रस्ता दुरूस्तीच्या सुचना दिल्या होत्या. मात्र दुरूस्तीनंतरही अवघ्या काही दिवसात रस्त्यावर खड्ड्यांची डोकेवर काढले आहे. मुळात जीथे खोलगट भाग आहे व पाणी साचते, अशा ठिकाणी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणाने सुरूवातीला खोदकाम करून त्याठिकाणी मोठ्या खडी व मुरूमाचा भराव करून रस्त्याची उंची वाढवून काँक्रिटीकरण करायला हवे होते.

Sambhajinagar
Sambhajinagar : उड्डाणपुलांवरील सुरक्षा कठडे, दुभाजकांबाबत आक्षेप

'टेंडरनामा'च्या वृत्तानंतर अधिकाऱ्यांना काँक्रिटीकरणाचे शहाणपण सुचले, मात्र ठेकेदाराने याकामातही हातचलाखी केल्याने पुन्हा खड्डे उघडे पडले आहेत. त्यात आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने फैठणरोड भुयारी मार्ग ते देवळाईपर्यंत रस्त्याचा शोल्डर खोदल्याने डांबरीपृष्ठभाग देखील खराब झाला आहे. 'टेंडरनामा'ने दोन्हीबाजूने ६० किलोमीटर लांबीच्या या रस्त्याची पाहणी केली असता लहान-मोठे एकूण ११२ पूलालगत आणि मोठ्या पुलांच्या भुयारी मार्गात आणि सर्व्हिस रस्त्यांवर खड्डे नव्हे, भगदाडंच पडलेली आढळली. तसेच आडगाव, कांचनवाडी, एएस क्लब, माळीवाडा व इतर ठिकाणी सुशोभिकरणाच्या जागी बेशरमाची झाडे व गाजरगवत  अन्य इतर रानटी झुडपी आढळली. या रस्त्याच्या बांधकामासाठी करदात्यांच्या खिशातून तब्बल ६१३  कोटी रुपये खर्च आला आहे. रस्त्यावर कांचनवाडी ते करोडीपर्यंत सर्व्हिस रोडची हालत देखील खराब झाली असून आडगाव, गांधेली, देवळाई, सातारा, एसआरपीएफ कँप, वाळूज लिंक रोड, तिसगाव चौफुली, करोडी येथे भुयारी मार्गात खाली खड्डे वर अंधार असल्याने नागरिकांची फसगत होत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com