Sambhajinagar : एक वर्षांपासून अंधार असलेल्या रस्त्यावर कंत्राटदार कधी दिवे लावणार?

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील धुत हाॅस्पीटल ते मेल्ट्राॅन हाॅस्पीटल  मार्गावरील सर्व्हीस रस्त्यावर गेल्या तीस वर्षांपासून पथदिवे लागलेले नाहीत. या अंधारलेल्या रस्त्यावर दिवे लावण्याची व्यवस्था महानगरपालिका कधी करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar News : 3 कोटींचा निधी मंजूर; मग 3 वर्षांपासून पुलाचे काम का रखडले?

धुत हाॅस्पीटल ते मेल्ट्राॅन हाॅस्पीटल या सिमेंट रस्त्याचे काम स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून गुळगुळीत करण्यात आले आहे. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शोल्डर फिलींग अथवा फुटपाथला बगल देण्यात आली आहे. रस्त्याचे काम गत वर्षांपूर्वी पूर्ण झाले. हे काम पूर्ण झाल्यानंतर  या मार्गावर दिवे लावण्यात आले नाहीत. त्यामुळे रात्री या मार्गावर अंधार असतो. या अंधारामुळे अनेक वाहनधारकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. रात्रीच्या वेळी सायकलने किंवा चालत जाणाऱ्या नागरिकांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत  महापालिकेच्या विद्युत विभागाने रस्त्याचे सर्व्हेक्षण करून दिवे लावणे गरजेचे आहे. रात्री अपरात्री रूग्णालयातून जाणाऱ्या रूग्ण व आसपासच्या रहिवाशांना भुरट्या चोरांची देखील धास्ती पसलेली आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : चिकलठाणा विमानतळ धावपट्टी विस्ताराबाबत भुमरेंचा पत्रव्यवहार; हे म्हणजे आजार म्हशीला...

"टेंडरनामा" प्रतिनिधीने रस्त्याची पाहणी केली असता, या मार्गावर शतपावली करणार्या महिलांचे मंगळसुत्र व नागरिकांचे मोबाईल लंपास करण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. परंतु  गेल्या एक वर्षांपासून या मार्गावर असलेला रात्रीचा अंधार अद्याप महानगरपालिकेने संपवला नाही. त्यामुळे या मार्गावर रात्रीचा प्रवास धोकादायक असल्याचे नागरिकांनी सांगितले.विशेषत:हा रस्ता जालना रस्त्याला समांतर असल्याने सायंकाळी मोठी वर्दळ असते. शहरातील अस्तीत्वात असलेले संपूर्ण पथदिवे काढून त्या ठिकाणी उर्जा बचत पथदिवे बीओटी तत्त्वावर लावण्यासाठी तसेच मुलभुत सुविधांची कामे करण्यासाठी महानगरपालिकेने दहा वर्षापूर्वी १२० कोटींचे टेंडर काढले होते. यात इलेक्ट्रॉन लायटींग सिस्टीमला हे काम देण्यात आले आहे. यासाठी कंत्राटदाराला दरमहा दोन कोटी ७२ लाखाचा इएमआय दिला जातो.कंपनीने या मार्गावर वीस खांब उभे केले आहेत. फिटींग देखील लावण्यात आल्या आहेत. मात्र गत वर्षांपासून खांबावर दिवे लावण्याचा संबंधित कंत्राटदाराला विसर पडला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com