Sambhajinagar : रस्त्याच्या कामात ठेकेदाराचा हलगर्जीपणा

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : खिवसरापार्क ते सहकारनगर या दरम्यान काँक्रिटीकरण करण्यासाठी दररोज 200 ते 300 फूट लांबीचे काम पूर्ण करणे अपेक्षित आहे. झालेल्या कामावर दिवसातून किमान दोन वेळा चांगल्या प्रमाणात पाणी मारणे आवश्यक असताना ठेकेदाराकडून पाणी मारताना मात्र हलगर्जीपणा केला जात आहे.

Sambhajinagar
झांबड इस्टेट परिसरातील नाला का बनला धोकादायक?

विशेष म्हणजे सर्वच रस्ता ओरबाडून ठेवल्याने वाहनधारकांना मनस्ताप सोसावा लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्यातील खड्ड्यात पाणी साचल्याने वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने दररोजच अपघाताचा सामना करावा लागत आहे. धक्कादायक म्हणजे सावधानतेचा इशारा देणारे फलकही खड्ड्यातील पाण्यात पडल्याने डेकेदाराचा उघडपणे हलगर्जीपणा दिसत आहे. दरम्यान सुरू असलेल्या कॉंक्रिटीकरणाच्या कामावर आवश्यक तेवढे पाणी मारले जात नसल्याने रस्त्याच्या मजबुतीवर परिणाम होताना दिसत आहे. इतर रस्त्याच्या कामात याच ठेकेदाराने अत्यंत कमी प्रमाणात पाणी मारल्याने रस्त्यांवर भेगा पडल्या आहेत. अनेक रस्ते उखडले  जात आहेत.

Sambhajinagar
Sambhajinagar : सरकार पावले; देवळाई रस्त्यासाठी 18 कोटींचे टेंडर

तब्बल तीस वर्षांनंतर या रस्त्याची खड्डेमुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. मात्र इतर रस्त्यांच्या कामाप्रमाणेच ठेकेदाराकडून याही रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा केला जात आहे. योग्य प्रमाणात पाणी न मिळाल्याने काँक्रिटला आलेला पांढरा रंग स्पष्ट दिसून येत आहे. एकदा  झालेले काम पुन्हा पुन्हा होणार नाही त्यामुळे आताच या ठेकेदाराकडून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य काळजी घेऊन काम करून घेण्यात यावे, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

Sambhajinagar
Nagpur : आता जूनमध्येच मिळणार ठेकेदारांना पैसे?, कारण...

कॉंक्रिटीकरण झाल्यानंतर पहिले सात दिवस अत्यंत काळजीपूर्वक पाणी मारत राहावे लागते. रस्त्यावर पाणी साठवून राहिल अशी व्यवस्था करावी लागते किंवा पोती आंथरुन रस्त्यावर ओलसरपणा ठेवावा लागतो. कॉंक्रिटीकरणानंतर 21 दिवस नियमित पाणी मारत रहावे लागते. सिमेंट काँक्रेटला मजबुती येण्यासाठी पुरेसे पाणी मिळणे अत्यंत आवश्यक असते अन्यथा भेगा पडणे, रस्त्याची लवकर झिज होणे असे दुष्परिणाम दिसून येतात व परिणामी रस्ता लवकर खराब होतो. ठेकेदाराच्या अशा हलगर्जीपणामुळेच स्मार्ट सिटी प्रकल्पातील सर्वच रस्त्यांची माती झाली आहे. कुठल्याही रस्त्यावर कामाची गुणवत्ता राखली गेली नाही. याबाबत स्मार्ट सिटी प्रकल्पातील प्रकल्प व्यवस्थापक देखील दक्ष नाहीत. तयार रेडिमिक्स काँक्रिटचा दर्जा देखील योग्य नाही.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com