Sambhajinagar : ठेकेदाराचा हलगर्जीपणा अन् नागरिकांना मनस्ताप

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ड्रेनेजलाइनचे पाईप गेल्या आठवड्यापासून फुटलेल्या अवस्थेत असल्याने चेतकघोडा चौकात घाण पाण्याचा तलाव साठला आहे. परिणामी वाहनधारक आणि आसपासच्या नागरिकांना दुर्गंधीचा मनस्ताप सोसावा लागत आहे. टिळकनगर ते जवाहरनगर पोलिस स्टेशन या रस्त्याचे काम गेल्या सहा महिन्यांपासून कासवगतीने सुरू आहे.

Sambhajinagar
NHAI : 75 वेसाईड सुविधांसाठी टेंडर; प्रवाशांना दर्जेदार सुविधा

टिळकनगर ते जवाहर काॅलनी पोलिस स्टेशन या रस्त्याच्या दुरुस्तीवर तब्बल सहा कोटी २८ लाखाचा खर्च केला जात आहे, असे असताना या रस्त्याची एक बाजु पुर्णपणे उखडलेली आहे. हा रस्ता जागोडागी उखडल्याने छत्रपती संभाजीनगरवासीयांना खड्डे आणि खाचखळग्यांचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. कोट्यावधीचा निधी खर्च करूनही मानकाप्रमाणे रस्ता तयार न केल्याने 'जनतेच्या' पैशाचे नुकसान झाले आहे. हा इतका सारा गोंधळ उडाला असताना ‘जाऊ द्या, मिटवून घ्या’, असे सांगत ठेकेदाराविरुद्ध कारवाई न करण्यासाठी स्मार्ट सिटी कारभाऱ्यांवर कुणाकडून दबाव आणला जात आहे, हा संशोधनाचा विषय आहे. विशेष म्हणजे गल्लीबोळात पाहणी करणाऱ्या मनपा प्रशासकांचे अद्याप या निकृष्ट कामाकडे लक्ष नाही.

Sambhajinagar
Nashik: का रखडली 'मातोश्री पांधण रस्ते योजना'?

पंधरा दिवसांपूर्वी विश्वभारती काॅलनीलगत चेतक घोड्याजवळ ठेकेदाराच्यावतीने भूमिगत ड्रेनेजलाइनचे मोठे पाईप टाकण्यासाठी खोदकाम करण्यात येत होते. जेसीबीच्या साहाय्याने होत असलेल्या या खोदकामामध्ये उल्कानगरी, जवाहरकाॅलनी व जय विश्वभारती काॅलनीची जुनी ड्रेनेजलाइन फुटली त्यामुळे चौकात घाण पाण्याचे तळे साचले. दुर्गंधीने चौकातून ये-जा करणे न बरे, अशी भावना लोकांच्या मनात घर करून बसली आहे. एकीकडे दुर्गंधी व वाहनांसह पाठीचा खुळखुळा होत असताना मात्र, दुरूस्तीकडे ठेकेदाराने पाठ दाखवली.

Sambhajinagar
Sambhajinagar : नवीन पाणी पुरवठा योजनेला घरघर; कारण...

ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याचा हलगर्जीपणा आणि त्यावर वचक नसलेल्या स्मार्ट सिटीतील कारभाऱ्यांमुळे या योजनेतील कोट्यावधी रूपयांच्या रस्त्यांना भेगा पडल्या. रस्ते उखडले. ठेकेदाराने सदर रस्त्यांचे काम योग्य दर्जाचे केले नसल्याचे टेंडरनानाने वृत्तमालिका प्रसिद्ध केली. दरम्यान प्रतिनिधीवर दबाब आणण्याचा देखील प्रयत्न केला गेला. याच वृत्तमालिकेवर शिक्कामोर्तब करत आयआयटीने देखील रस्त्यांच्या दर्जाबाबत चिंता व्यक्त करणारा अहवाल सादर केला.

Sambhajinagar
Sambhajinagar : सात कोटींच्या आदर्श काँक्रिट रस्त्याला लावले कटर

नागरिकांचा मनस्ताप होण्याबरोबरच रस्ते कामातील भ्रष्ट्राचार छत्रपती संभाजीनगरकर उघड्या डोळ्याने पाहत आश्चर्यव्यक्त करत असताना नागरिकांचे प्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या काही मंडळींकडून ठेकेदाराची बाजू घेण्याचे काम करण्यात येत आहे. ‘जाऊ द्या, मिटवून घ्या. ठेकेदाराला कशाला गोत्यात आणता’ असे म्हणत ठेकेदाराविरुद्ध कारवाई न करण्याबाबत अप्रत्यक्षपणे दबाव आणला जात आहे. याउलट योजनेतील रस्त्यांचे काम पर्वडत नाही , असे म्हणत टेंडरमध्ये दरवाढ ही अट नसताना  त्याला मात्र, स्मार्ट सिटी योजनेतील रस्ते बांधनीचा लागणारा खर्च हा जास्तीचा असल्याचा कानमंत्र देत दरवाढीची मागणी करायला सांगत आहेत. याउलट योजनेतील रस्त्यांचे काम कासवगतीने व निकृष्ट पध्दतीने होत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबरोबरच त्याच्याकडून नुकसान भरपाईही घेतली जावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Sambhajinagar
Aurangabad : शिवाजीनगर भुयारी मार्ग; मुल्यांकनाला सरकारची मंजुरी

‘नागरिकांची परेशानी’!

ठेकेदाराच्या वतीने टाकण्यात येणाऱ्या ड्रेनेजलाइन व अतिमहत्त्वाच्या भूमिगत कामांचा नकाशा महापालिकेने त्याला दिलेला असतो. ठेकेदाराकडून संबंधित रस्त्यावर खोदकाम करायचे असल्यास संबंधित ठेकेदाराला त्याबाबत महापालिका अधिकाऱ्यांकडून सूचनाही दिल्या जातात. महत्त्वाच्या वाहिन्या असलेल्या रस्त्यांवर खोदकामापूर्वी संबंधित केबल कंपन्या, महापालिका व बीएसएनएलसह गॅसपाईपलाइन कर्मचाऱ्यांचा युटीलीटी व्हाॅटसऍपग्रुप देखील कार्यरत आहेत. अशावेळी सर्वच कर्मचारी सातत्याने खोदकामावर लक्ष ठेवून असतात. मात्र, शहरातील स्मार्ट रस्त्यांचा ठेकेदार रस्त्यावर मनमानी पद्धतीने खोदकाम करीत असताना कोणताही नकाशा पाहत नाही किंवा खोदकामाबाबत नियमांचे पालन करीत नाही. परिणामी चेतक घोडा चौकात भूमिगत पाइप टाकताना जुनी भूमिगत ड्रेनेजलाइन फुटली. त्याचा भुर्दंड नागरिकांना बसला. हा एकच नव्हे, अनेक रस्त्यांच्या कामात सातत्याने होत असलेले हे प्रकार नागरिकासाठी ‘परेशानी’ ठरत आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com