Chhatrapati Sambhajinagar : विमानतळ विस्तारीकरणाच्या बैठकीतही 'त्याच' मुद्द्यांची चर्चा

sambhajiagar
sambhajiagarTendernama
Published on

Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर : येथील चिकलठाणा विमानतळाच्या विस्तारीकरणाबाबत आज पार पडलेल्या बैठकीत टेंडरनामाने उपस्थित केलेल्या मुद्यांवरच बैठक पार पडली. या बैठकीनंतर तातडीने टेंडरनामाने सुचवलेल्या उपायांनुसार रेल्वे, बांधकाम विभाग, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण व महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

sambhajiagar
BMC Tender : रंगशारदा भागातील रस्त्यांचे 100 कोटींचे टेंडर फ्रेम; 'तो' अधिकारी कोण?

मंगळवारी १६ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक, विशेष भूसंपादन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, उप विभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, बीएस एनएलचे मुख्य प्रबंधक, भूमी अभिलेख विभागाचे उप अधीक्षक, जिल्हाधिकारी कार्यालयातील विधी अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक, जिल्हा वन अधिकारी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी, रेल्वे व‌ बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच सिडको प्रशासक व सिडकोचे भूमापक विमानतळ विस्तारीकरण नागरी कृती समितीचे सदाशिव पाटील व इतर बैठकीला उपस्थित होते.

दरम्यान, विमानतळाच्या विस्तारीकरणात मुळ अडथळा असणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेबाबत नेमक्या काय अडचणी आहेत, या टेंडरनामाने प्रकाशित केल्या होत्या व त्यावर उपाय सुध्दा सुचवले होते. त्याच अडचणी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड व जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष भूसंपा दन अधिकाऱ्यांकडून समजून घेतल्या. त्यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी सर्वच उपस्थित अधिकाऱ्यांसमवेत तातडीने संयुक्त पाहणी करा, अशा सूचना कराड यांनी दिल्यानंतर अधिकाऱ्यांची संयुक्त पाहणी देखील केली.

sambhajiagar
Pune : पुणे रल्वेस्टेशनवरून आता प्रवास होणार गतिमान, वेळही वाचणार; कारण...

छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या मौजे चिकलठाणा, मौजे मुकुंदवाडी, मौजे मुर्तुजापूर येथील ५२.६५३० हे. क्षेत्राच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांना ६६.७८ कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. मात्र महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने तसेच भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाने काही त्रुटींची पूर्तता न केल्याने भूसंपादनाची प्रक्रिया रखडल्याचा खास रिपोर्ट टेंडरनामाने सखोल अभ्यास करून वृत्त मालिका प्रकाशित करून संबंधित अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून घेतले होते. विशेष म्हणजे भूसंपादनाबाबत नेमक्या काय अडचणी आहेत व त्यावर नेमका काय उपाय आहे. याचा संपूर्ण लेखाजोगाच टेंडरनामा अत्यंत अभ्यासात्मकरित्या मांडला होता.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी चिकलठाणा विमानतळाचे विस्तारीकरण आवश्यक आहे. यासाठी केंद्रीय उड्डयन मंत्रालयाने भूसंपादन व विस्तारीकरणासाठी तब्बल ७३४ कोटींची तरतूद केली आहे. चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणासाठी मौजे चिकलठाणा, मौजे मुकुंदवाडी, मौजे मुर्तुजापूर येथील ५२.६५३० हे. क्षेत्राच्या भूसंपादनाची आवश्यकता आहे. यासाठी भूसंपादन अधिकाऱ्यांची देखील नियुक्ती झाली आहे.‌ मात्र, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांनी नेमक्या कोणत्या त्रुटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्या त्रुटीही टेंडरनामाने शोधून काढत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी व भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आणला होता.‌

भूसंपादन प्रक्रिया रखडल्याच्या धक्कादायक बाबी टेंडरनामाने वृत्तमालिकेद्वारे समोर आणल्या होत्या. त्याची दखल घेत माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत दोनदा बैठक लावली. मात्र आजच्या बैठकीनंतर त्यांनी पुन्हा या विषयावर चर्चा न करता थेट कृती करा व तुमच्या अधिपत्याखाली सर्व अधिकार्यांचा योग्य समन्वय ठेऊन ऑनलाईन बैठका घ्या व विमातळ विस्तारीकरण जलदगतीने होण्यासाठी भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करा, अशा कडक सूचना अधिकाऱ्यांना केल्या.

sambhajiagar
Nagpur : जाम प्रकल्पाच्या कालवा विकासासाठी मिळाले 92 कोटी

दरम्यान भूसंपादनाबाबत विलंब व अडथळा येऊ नये, यासाठी पुढील महिन्यात विशेष भूसंपादन अधिकारी विश्वनाथ दहे यांच्याकडेच प्रतिनियुक्तीवर घेण्यासाडी शिंदे सरकार यांच्याकडे मुद्दा उपस्थित करणार असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान सर्व अधिकार्यांनी संयुक्त पाहणी करून तातडीने भूसंपादनाचे काम सुरू करा, सिडको व म्हाडा काॅलनीतील विस्तारीकरणात बाधीत घरांचा अभ्यास करा, सिडकोचा कोणता २४ मीटर रस्ता बाधीत होत आहे, त्याचा नीट अंभ्यास करा, सदर रस्ता बंद झाल्यास दुसऱ्या रस्त्याचा पर्याय शोधा, अद्याप महानगरपालिकेचा विकास आराखडा अंतिम झाला नाही, त्यात विमानतळ विस्तारीकरणात बाधीत क्षेत्राचा उल्लेख करा, जुना बीड बायपासचे विमानतळ विस्तारीकरणात भूसंपादन होणार आहे, त्याचा नेमका किती खर्च बांधकाम विभागाला द्यावा लागणार त्यासोबतच हा रस्ता बंद झाल्यावर पर्यायी मार्ग शोधा, विमानतळ विस्तारीकरणात रेल्वे रूळ व एसटीपी प्लॅंटचा काही अडथळा येत आहे का, तेही तपासा, ५० वर्षांपर्यंत विस्तारीकरणाची गरज नको, आत्ताच धावपट्टी विस्ताराबाबत निर्णय घ्या, आता १२ हजार फूट धावपट्टी वाढणार आहे, नंतर मागणी करू नका, असे अधिकाऱ्यांना कराड यांनी सांगितले.

चिकलठाणा रस्त्याची आखणी जागेच्या स्थितीप्रमाणे करावी, एसटीपी प्लॅंटसाठी पर्यायी जागा पहावी, मुकुंदवाडी सिडको भागातील २४ मीटर रस्त्याला पर्यायी रस्ता प्रस्तावीत करावा, अशा सूचना देखील त्यांनी दिल्या.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com