छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला पाण्याचा वेढा; काय आहे प्रकरण?

Sambhajianagar
SambhajianagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : संपूर्ण जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवणाऱ्या व्हीआयपी रोडलगत जिल्हाधिकारी कार्यालयासह येथील विविध कार्यालयांच्या परिसराला अवकाळी पावसाच्या पाण्याने वेढा घातला आहे. त्यावर उपाययोजना केली जात नसल्याने सरकारी कामकाजानिमित्त येणाऱ्या नागरिकांसह अधिकारी कर्मचाऱ्यांना मनस्ताप सोसावा लागत आहे.

Sambhajianagar
Nashik : दोन वर्षांपासून चर्चेत असलेल्या आयटी पार्कला अखेर 'येथे' 50 एकर जागा

व्हीआयपी रस्त्यालगत जुने कार्यालय आणि नवी प्रशस्त इमारत मिळून जिल्हाधिकारी कार्यालय उभारण्यात आले. यात उपविभागीय अधिकारी कार्यालय, निझामकालीन सभागृह, महसूल कोतवाल कर्मचारी संघटना कार्यालय, पुरवठा विभाग, अन्न-धान्य वितरण कार्यालय, आधार भवन, संजय गांधी निराधार योजना कार्यालय, बचत भवन, जिम्नॅशियम हॉल, प्रादेशिक उपायुक्त मत्स्य विभाग, सह. आयुक्त मत्स्य व्यवसाय, सह. दुय्यम निबंधक वर्ग 2, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग, तलाठी कार्यालय, महसूल मंडळ विभाग, महसूल मंडळ अधिकारी, विभागीय सहायक संचालनालय, अल्पबचत विभाग, अभिलेख कक्ष, मंडळ अधिकारी कार्यालय, सेतू सुविधा केंद्र, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ, संगणकीकृत सातबारा डाय सेंटर, फाजलपुरा डाकघर, तहसील कार्यालय इत्यादी कार्यालये आहेत.

या संपूर्ण परिसरात कुठल्या ना कुठल्या कार्यालयात तुमचे-आमचे रोज काहीना काही काम पडते. त्यासाठी येथे येणार्‍यांना काम होईल का नाही हे पाहण्याआधीच वरील असुविधांचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात समाजसेवक मनिष नरवडे यांनी तक्रार केल्यानंतर प्रतिनिधीने सलग दोन दिवस येथील सर्वेच कार्यालय परिसराची पाहणी करत खरपूस समाचार घेतला.

Sambhajianagar
Nashik : इटलीतील 33 कोटींचे झाडू करणार नाशिकची स्वच्छता

आवारात बजबजपुरी

उपविभागीय कार्यालयाकडून प्रवेश करतानाचे प्रवेशद्वार तुटले आहे. मुख्य दरवाजातून आत प्रवेश करताच बहुतांश उपविभागांच्या आवारात जागोजागी कचरा साठलेला असतो. सध्या अनेक उपविभागांची बाहेरून रंगरंगोटी दिसेनाशी झाली आहे. आत - बाहेर परिसरात  आतमध्ये घाण पडलेली दिसते. परिसरातील चहाच्या टपर्‍या या प्लास्टिकच्या ग्लासची भर टाकतात. या संपूर्ण घाणींमुळे जनावरांचाही परिसरात ठिय्या असतो.

कचर्‍याची जाळपोळ

कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी परिसरातील कचरा दररोज जाळला जातो. आधीच दुर्गंधी आणि घाण त्यात कचर्‍याचा धूर यामुळे जनतेला त्याचाही त्रास होतो. अशा प्रकारे कचरा जाळणे अपेक्षित नाही.

खराब विद्युत उपकरणे

जिल्हाधिकारी कार्यालयातील उप कार्यालयांच्या इमारतीतील विद्युत उपकरणांचे वायर्स उघड्या पडलेल्या आहेत. त्यातच नादुरुस्त दिवे, पंखे व अन्य उपकरणेही दिसतात. काही ठिकाणी तर उघडे फ्यूजबॉक्सही पाहायला मिळतात.

Sambhajianagar
Nagpur : अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होणार पण रामटेकच्या गडमंदिराचा वनवास कधी संपणार?

जिथे तिथे कचरा

पडक्या इमारती, सर्दावलेल्या भिंती, खिडक्यांची फुटकी तावदाने, भंगार वाहनांचा ढिगारा व जागोजागी कचरा ही परिस्थिती आहे जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची. मोकाट जनावरे आणि चिखल यामुळे परिसरात सर्वत्र डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. विशेष म्हणजे मुख्य इमारतीच्या वाहनतळालगत व इतर इमारतींमध्ये स्वच्छतागृहही बंद आहेत.

शिवाय परिसरातच कचरा जाळला जातो. परिणामी सगळीकडे दुर्गंधी पसरते. आयएसओ दर्जा मिळालेल्या या कार्यालयाच्या काही इमारतींची रंगरंगोटी पुसट झाली आहे. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.

पाणी आणि स्वच्छतागृहांचा अभाव
परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. दुसरीकडे स्वच्छतागृहांचा अभाव आहे. काही जुनाट व अतिशय वाईट अवस्थेतील स्वच्छतागृहे झाकण्यासाठी त्यापुढे भिंत बांधली आहे. त्यामुळे लोकांना पर्याय नसल्याने वाटेल तिथे विधी उरकले जातात. त्यामुळेही परिसरात दुर्गंधी पसरते.

अडचणींचा डोंगर

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत परिसरात 1987 मध्ये उभारल्या गेलेल्या मुख्य सभागृहाची वाट लागली आहे. याच परिसरात ग्रामिण पोलिस प्रशिक्षण केंद्राची बंद इमारत आहे. परिसरात पार्किंगची सुविधा चांगली नाही. त्यामुळे जागोजागी कुठेही वाहने लावलेली दिसतात.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com