छ. संभाजीनगरातील 'या' रस्त्याचे काम मार्गी लावणार; कोणी दिले आश्वासन?

Sambhajinagar Municipal Corporation
Sambhajinagar Municipal CorporationTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगरातील झोन क्रमांक - ७ - ८ मधून उल्का नगरी, टिळक नगरकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून त्रिमूर्ती चौक ते चेतक घोडा या विकास आराखड्यातील १२ मीटर खड्डेमय रस्त्याच्या बांधकामाकडे मनपाचे दुर्लक्ष होत असल्याने व्यापारी व नागरीकांनी नाराजी व्यक्त केली होती. गेल्या तीस वर्षांत साधे डांबर देखील शिंपडले नसल्याने ऐन दिवाळीत नागरीकांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. अनेक वर्षांपासून हा रस्ता रखडला आहे.

Sambhajinagar Municipal Corporation
Nashik : 'रामसेतू'वर होणार धनुष्य पूल; तर तपोवनात लक्ष्मण झुला

यावर टेंडरनामाने वाचा फोडताच तोडगा काढण्यासाठी नुकत्याच झालेल्या पाहणीत मनपा प्रशासकांनी दिवाळीनंतरचा मुहूर्त निश्‍चित करून त्यानंतर रस्त्याचे सिमेंटीकरन करण्याचे येथील नागरिकांना आश्वासन दिले आहे. दरम्यान प्रशासक व अधिकाऱ्यांचेएकमत झाल्याने हा रखडलेला रस्ता मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टेंडरनामाच्या वृत्तानंतर मनपा प्रशासक तथा आयुक्तांनी थेट त्रिमूर्ती चौक ते चेतक घोडा रस्त्याची पाहणी केली. दरम्यान रखडलेल्या या रस्त्याच्या संदर्भात त्यांनी मनपा व स्मार्ट सिटी कार्पोरेशनच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. त्यावर पाइपलाइन टाकण्याचे काम झाले आहे, असे उत्तर मिळाले. त्यामुळे या रस्त्याचे काम दिवाळीनंतर सुरू करण्याचे आदेश प्रशासकांनी दिले. स्मार्ट सिटी कार्पोरेशनच्यावतीने रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे.

जवाहर काॅलनी ते चेतक घोडा रस्त्याची पूर्व - दक्षिण दिशा आहे. या रस्त्यावर मोठी बाजारपेठ, रुग्णालय आहेत. या रस्त्यावरून गारखेड्यातील गजानन मंदिर ते उल्कानगरीकडे जाण्यासाठी सध्या एकच मोठा रस्ता आहे.

Sambhajinagar Municipal Corporation
MSRTC : उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय; राज्यातील प्रमुख 30 बस स्थानकांवर...

या भागातील लोकसंख्या व वाहनांची संख्या वाढली आहे. मात्र कित्येक वर्षांपासून रस्त्याची दुरुस्ती झाली नव्हती. त्यामुळे येथे सिमेंट रस्ता व्हावा, अशी नागरिकांची मागणी आहे. मनपाने गत काही वर्षांत या रस्त्याला जोडनाऱ्या रस्त्यांची दुरुस्तीसाठी जवळपास ५० कोटी रुपये खर्च केला आहे. मात्र त्रिमूर्ती चौक ते चेतक घोडा रस्ता हा सुमारे १२०० मीटर लांबीचा रस्ता नेहमीप्रमाणे तसाच रखडला आहे.

त्यावर टेंडरनामा वृत्तानंतर प्रशासकांनी नागरिकांची कैफियत ऐकून घेतली. येथे रस्ता करताना पाइपलाइन टाकण्याचे काम बाकी असल्याने अडथळा येत होता. आता काम झाले आहे. त्यामुळे आता काही अडचण नसल्याचे स्मार्ट सिटी कार्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याने दिवाळीनंतर काम सुरू करण्याचे ठरले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com