Sambhajinagar : साडेचार कोटींच्या सिमेंट रस्त्याचे काम कासवगतीने

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, दमडी महल व चंपाचौक ते कटकटगेट या सिडको-हडको टीव्हीसेंटरला जोडलेल्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम मागील सहा महिन्यांपासून कासवगतीने सुरू आहे. रस्त्याच्या कामातही अनेक त्रुटी असल्याचा आरोप येथील स्थानिकांनी केला आहे. रस्त्याची एक बाजू पूर्ण करून रस्ता हा रस्ता रहदारीस सुरू करण्यात आल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Sambhajinagar
Exclusive: आस्तिककुमार पाण्डेय कुणाच्या दबावाला बळी पडले?

स्मार्ट सिटी कार्पोरेशनमार्फत टाईम्स काॅलनी ते कटकट गेट हद्दीत जवळपास एक किलोमीटरच्या साडेचार कोटीच्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा पाणी वाहून जाण्यासाठी मोठ्या भूमिगत नालीची सोय करण्यात आली नाही. एका बाजुने सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. त्याच्या बाजुला पायी चालणाऱ्यासाठी फूटपाथ तयार करण्यात आला आहे. पण नाली तयार न केल्याने रस्ता आणि फुटपाथची उंची वाढल्याने येथील अंतर्गत रस्त्यांवर पावसाचे पाणी तुंबत आहे. शिवाय आसपासच्या घरादारात आणि दुकानात पाणी शिरत असल्याने नागरिकांना मनस्ताप सोसावा लागत आहे.

Sambhajinagar
PM नरेंद्र मोदींच्या 'या' योजनेला कोणी लावला 1 हजार कोटींचा चुना?

दुसऱ्या बाजुने रस्त्याच्या बांधकामासाठी संपुर्ण खोदकाम करण्यात आले आहे. मात्र एका बाजुने वाहतुकीसाठी उंच रस्ता आणि दुसर्या बाजुने खोलगट भाग झाल्याने येथे दररोज अपघाताचे सत्र चालु आहे. वाहतूकमार्गावरील रस्त्यावर सुरक्षासाधने लावण्यात आली नाहीत. त्यामुळे वाहनधारकांना मृत्युच्या दाढेतून प्रवास करावा लागत आहे. रस्त्याचे काम देखील निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याची याभागात जोरदार चर्चा आहे. रस्ता बांधकामादरम्यान ड्रेनेजलाईन आणि फुटलेल्या पाईपलाईन व विविध केबल नेट कंपन्यांच्या भुमिगत केबलची जोडणीचे काम देखील अर्धवट असल्याने नागरिकांच्या त्रासात भर पडल्याचे येथील रहिवाशांनी सांगीतले. या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार फोन करूनही प्रतिसाद मिळाला नाही.उपरोक्त समस्या अथवा भविष्यात निर्माण होणारी संभाव्य दुर्घटना पाहता संबंधित विभागाने जातीने लक्ष घालून कंत्राटदाराकडून मोठ्या पावसाआधी तातडीने कामे पूर्ण करून घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com