Sambhajinagar: आधी दिला बांधकाम परवाना; तक्रारीनंतर चक्क माघार

Chhatrapati Sambhajinagar: महापालिका नगर रचना विभागातील उप अभियंत्याचा प्रताप
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : मौजे मुस्तफाबाद येथील गट क्रमांक २/ पैकी क्षेत्रातील भूखंड क्रमांक - १९ येथील महापालिकेच्या मंजूर विकास रेखांकनातील खुल्या जागेवर थेट बांधकाम परवाना दिल्याचा आणखी एक धक्कादायक भूखंड घोटाळा 'टेंडरनामा'च्या तपासात उघड झाला आहे.

Chhatrapati Sambhajinagar
इतवारी - नागभीड रेल्वे लाईनला महिन्याभरात मिळणार Green Signal

या प्रकणात रेखांकनातील इतर लोकांनी आक्षेप घेतल्याचा सुगावा लागताच उप अभियंत्याने झालेल्या चुकीवर पांघरून घालण्यासाठी बांधकाम परवाना रद्द केला. मात्र त्यातही गंभीर अनियमिता केल्याने आता या उप अभियंत्याच्या अडचणीत वाढ झाली असून 'टेंडरनामा' प्रतिनिधीकडून या संपूर्ण प्रकरणाची माहिती प्राप्त होताच महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी येथील भूखंड घोटाळ्याची जलदगतीने चौकशी सुरू केली आहे.

विशेष म्हणजे सात वर्षांपूर्वी सदर भूखंडावर बांधकाम परवाना नाकारलेला होता. अर्जदाराला चार वेळा कळविले असताना देखील संबंधित उप अभियंत्याने कोणत्या खुशीत बांधकाम परवाना दिला, हे एक न उमजलेले कोडे आहे. आता महापालिका प्रशासक जी. श्रीकांत याप्रकरणी संबंधित उप अभियंत्यावर काय कारवाई करतात याकडे 'टेंडरनामा'चे बारकाईने लक्ष आहे.

Chhatrapati Sambhajinagar
Nashik:500 कोटी गुंतवणुकीच्या ड्रायपोर्टसाठी 116 एकर जमिनीची खरेदी

सातारा परिसरातील मौजे मुस्तफाबाद येथील गट क्रमांक २ / पैकी भूखंड क्रमांक १९ हा महानगरपालिकेच्या तात्पुरत्या मंजूर रेखांकनातील रेखांनधारकांसाठी खुली जागा म्हणून राखीव ठेवन्यात आला आहे. या भूखंडावर अब्ब्दूल सनी खान हफीज खान मेहमुद खान व इतर एकाने वास्तुविशारद विशाल अमरसिंह बन्सवाल यांच्यामार्फत २८ नोव्हेंबर २०२२ रोजी ऑनलाईन बांधकाम परवान्यासाठी महापालिकेच्या नगर रचना विभागात प्रस्ताव दाखल केला होता. (प्रस्ताव क्रमांक १५४१५९ अर्ज क्रमांक डीडीएमसीबी / २०२२०१६३५ प्रस्ताव नं. २२ - ९०२०३).

त्यावर महापालिका नगर रचना विभागातील एका उप अभियंत्याने भूखंडाबाबत कोणतीही खातरजमा न करता तीन महिन्यांच्या कालावधीत अर्थात ७ फेब्रुवारी २०२३ रोजी थेट बांधकाम परवाना दिला.

विशेष म्हणजे यापूर्वी सदर भूखंडावर बांधकाम परवान्यासाठी अर्जदाराने २४ फेब्रुवारी २०१६ मध्ये ऑफलाईन प्रस्ताव दाखल केला होता. दरम्यान सदर भूखंड हा मंजूर रेखांकनातील खुल्या जागेत असल्याने महापालिकेतील नगर रचना विभागातील तत्कालीन उप संचालकांनी (पत्र जा.क्र. मनपा/ नरवि/ ससंनर/ २०१६ / ११२७) यानुसार प्रस्ताव नामंजूर करण्यात आला होता, असे असताना उप अभियंत्याने याच भूखंडावर बांधकाम परवाना मंजूर केला.

Chhatrapati Sambhajinagar
समृद्धीनंतर 'या' 388 किमी ग्रीन फिल्ड द्रुतगती महामार्गावर मोहोर

रेखांकनधारकांकडून तक्रार उप अभियंत्यांकडून माघार

या प्रकरणी रेखांकन धारकांनी तत्कालीन महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे तक्रार केल्याचा सुगावा लागल्यानंतर संबंधित उप अभियंत्यांनी या भूखंडाबाबत शहानिशा केली. त्यात सदर भूखंड हा रेखांकनातील खुली जागा असल्याचे लक्षात आले. तसेच यापूर्वी महापालिकेने १ ऑगस्ट २०१६, १३ एप्रिल २०१८, २१ जानेवारी २०१९ व २१ एप्रिल २०२१ रोजी सदर भूखंड मंजूर रेखांकनातील खुली जागा असल्याचे कळविले होते.

त्यानंतर देखील अब्ब्दुल समी खान हफीज खान महेमुद खान व इतरांच्या वतीने आपण महापालिकेतील नगर रचना विभागात बांधकाम परवान्यासाठी ऑनलाईन प्रस्ताव दाखल केला, असे म्हणत वास्तुविशारद विशाल अमरसिंह बन्सवाल यांच्यावर कार्यालयाची दिशाभूल करून बांधकाम परवाना प्राप्त केल्याचा ठपका ठेवला. यात प्राप्त केलेला बांधकाम परवाना रद्द करण्याची तंबी देत आपला व्यावसायिक वास्तुविशारदाचा परवाना का रद्द करण्यात येऊ नये, अशी विचारणा करत २४ तासांच्या आत खुलासा मागवला.

अखेर बांधकाम परवाना रद्द

वास्तुविशारदाने सदर बांधकाम परवाना रद्द करण्याबाबत कुठलीच हरकत नसल्याचा खुलासा कळविल्यानंतर उप अभियंत्याने तो रद्द केला. मात्र महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियमानुसार बांधकाम परवाना रद्द करण्याचा अधिकार उप संचालकांना असताना उप अभियंत्यानेच चुकीने दिलेला बांधकाम परवाना स्वतःच रद्द केल्याची गंभीर अनियमितता केली.    

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com