LIVE रिपोर्ट : बाळासाहेबांच्या स्मारकाचे देणे कोट्यावधींचे

औरंगाबादच्या स्थानिक ठेकेदारांनी केली नोएडा कंपनी अधिकाऱ्यांची कोंडी
Aurangabad
AurangabadTendernama
Published on

औरंगाबाद (Aurangabad) : महापालिका अंतर्गत सुरू असलेल्या स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या बांधकामासाठी निधी द्या म्हणत मुळ ठेकेदार कंपनी गेल्या सहा महिन्यांपासून महापालिकेकडे पाठपुरावा करत आहे, तर महापालिका सरकारकडून निधी येत नसल्याचे म्हणत ठेकेदाराची बोळवण करत आहे. दुसरीकडे सरकारकडून आश्वासनाशिवाय काहीच मिळत नसल्याने मंगळवारी (२७ सप्टेंबर) सकाळी साडेदहाच्या सुमारास होत असलेल्या स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक परिसरात औरंगाबादच्या स्थानिक ठेकेदारांनी मुळ ठेकेदार  कंपनीच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कोंडी केली. कंपनीकडून पैसा मिळत नसल्याने आमच्यावर  हा अन्याय आहे. त्यात आमच्याकडील मजुर देखील भरडले जात आहेत, असा जाब अधिकाऱ्यांना विचारत स्धानिक ठेकेदारांनी घेराव घातला. त्यात पंधरा दिवसात सर्वांचा पैसा देऊ असे आश्वासन देत अधिकाऱ्यांनी सुटका करून घेतली. टेंडरनामाचा हा लाईव्ह रिपोर्ट...

Aurangabad
शिंदे सरकार ठाकरेंवर सुडाने पेटले? आता थेट शिवभोजन थाळीवर...

राज्य सरकारसह महापालिकेच्या बांधकाम  विभागाने कोरोनाचे कारण पुढे करत मुळ ठेकेदार कंपनीची देणी प्रलंबित ठेवली आहे. परिणामी या मुळ ठेकेदार कंपनीने औरंगाबादेतील ५० ते ६० स्थानिक ठेकेदारांची  मिळून तब्बल एक ते दिड कोटींची देणी प्रलंबित ठेवली आहे. तो मिळण्यासाठी या सबठेकेदारांचा कंपनीकडे गेल्या सहा महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. मूळ ठेकेदाराने स्मारकाचे काम पॅराडेट आणि व्हाईट्री या दोन कंपन्यांना दिलेले आहे. या कंपनींकडे थकित रक्कम मागितली असता सदर कंपन्या नोएडाच्या मे. एमएसएल जांगिड व जेआयव्ही एमएस. डिझाईन फॅक्टरी इंडिया या कंपन्यांकडे बोट दाखवतात. कंपनींच्या एकमेकाकडे बोट दाखवण्याच्या वृत्तीवर सब ठेकेदारांची उपेक्षा होत होती. शिवाय ऐन सणासुदीच्या काळात त्यांच्याकडील मजुरांचा उपासमारीचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

Aurangabad
'शिंदे-फडणवीस अजून एक प्रकल्प राज्याबाहेर चाललाय, माहिती आहे का?'

तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकास मान्यता दिली होती. त्यानंतर महापालिकेचे माजी सभागृहनेता राजेंद्र जंजाळ यांनी ३१ ऑगस्ट २०१६ रोजी संपन्न झालेल्या महापालिकेच्या  सर्व साधारण सभेसमोर मांडलेल्या प्रस्तावास माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी ठराव क्रमांक ५४४ नुसार मान्यता दिली होती. त्यानंतर सिडको येथील एम.जी.एम.लगत महापालिकेच्या प्रियदर्शनी बाल उद्यानातील १७ एकर जागेवर स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक व म्युझियम उभारणे तसेच रिफ्रेशमेंट सेंटर उभारणे व भारतीय वंशावळीची झाडांची लागवड करणे आदी कामांचा त्यात समावेश करण्यात आला  यासाठी तत्कालीन महाआघाडी सरकारणे जाहिर केलेल्या २१ कोटी ४७ लाख निधीसमोर ठेऊन निविदा मागविण्यात आल्या होत्या. निविदेत यशस्वी झालेल्या नोएडाच्या  मे. एमएसएल जांगिड व जेआयव्ही एमएस. डिझाईन फॅक्टरी इंडिया या कंपनीला स्मारक उभारणीसाठी २५ मार्च २०२१ रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. या कामाची मुदत १८ महिने आहे. मात्र कंपनीने पॅराडेट व व्हाइटरी कंपनींना सब ठेका दिलेला आहे.

Aurangabad
धारावी पुनर्विकासासाठी १५ दिवसात ग्लोबल टेंडर; चौथ्यांदा प्रक्रिया

स्थानिक ठेकेदारांनी केला राडा

दरम्यान, ठाकरे यांच्या स्टेच्यूसाठी आवश्यक असणारे स्मारकाचे बांधकाम, सुशोभिकरण व कारंजा हौद तसेच स्मारकाकडे जाणारे काॅक्रीट रस्ते ,आरसीसी पुलांचे बांधकाम, म्युझियम इमारत, प्रसाधनगृहे, तलावाचे रूंदीकरण, खोलीकरण व बंधारा बांधने तसेच वृक्षारोपणासाठी खड्डे तयार करणे, निगा राखणे आदी स्मारकातील  विविध कामे कंपनीने स्थानिक  ठेकेदारांकडून केली. यासाठी आवश्यक असणारे बांधकाम साहित्य, मनुष्यबळ देखील दिले. यापोटी स्थानिक ठेकेदारांनी त्यांची बिले सहा महिन्यांपूर्वीच संबंधित कंपनीला सादर केली. मात्र त्यांची  बिले प्रलंबित राहिली. औरंगाबादेतील या ५० ते ६० स्थानिक ठेकेदारांचे तब्बल एक ते दीड कोटी रुपये कंपनीने थकविले आहेत. त्यामुळे हा वर्ग सध्या हवालदिल आहे. परिणामी या सर्व स्थानिक ठेकेदारांनी नोऐडाच्या मे. एम एस एल जांगिड व जेआयव्ही एमएस. डिझाईन फॅक्टरी इंडिया या कंपनीचे संचालक एस. डी. शर्मा, व्यवस्थापक एस.डी.शर्मा, प्रकल्पाच्या प्रसिध्दी प्रमुख निहारीका शर्मा, कंत्राटदार ॠषभ कौशिक यांची चांगलीच कोंडी केली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com