औरंगाबादेत स्मार्ट सिटीकडून इलेक्ट्रिक बसचे फिल्ड ट्रायल सुरू

Aurangabad
AurangabadTendernama
Published on

औरंगाबाद (Aurangabad) : स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू करण्यात येणारी इलेक्ट्रिक बसचे फिल्ड ट्रायल सोमवारी सुरू करण्यात आले. यशस्वी चाचणी झाल्यावरच एजन्सी अंतिम करण्यात येणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि औरंगाबाद स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद स्मार्ट सिटीने शहरात सार्वजनिक वाहतुकीसाठी 35 इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यासाठी टेंडर काढले होते. टेंडरमध्ये तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरलेल्या एजन्सीकडून फील्ड ट्रायल करण्यात येणार आहे.

Aurangabad
औरंगाबादकरांना मोठा दिलासा; आता आषाढी एकदशीपासून पाणी...

हे ट्रायल औरंगाबाद स्मार्ट सिटीतर्फे थर्ड पार्टी ऑडिटसाठी नियुक्त एजन्सी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ह्यांचा देखरेखीखाली करण्यात येत आहे. बसेसचे ट्रायलच्याद्वारे ट्रॅफिक परिस्थितीमध्ये बसची परफॉर्मन्स, बॅटरीची क्षमता, चार्जिंगची यंत्रणा व अन्य तांत्रिक बाबी समजून येतील असे स्मार्ट सिटी बसचे प्रकल्प सहयोगी ऋषिकेश इंगळे यांनी सांगितले.

Aurangabad
औरंगाबादेत 13 कोटी खर्चूनही नालेसफाई अपूर्णच; कुठे गेला पैसा?

यावेळेस स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, स्मार्ट सिटी बसचे मुख्य चालन व्यवस्थापक राम पवणीकर, उपव्यवस्थापक मुकुल देव, सिद्धार्थ बनसोड, प्रकल्प सहयोगी ऋषिकेश इंगळे व अन्य उपस्थित होते. ट्रायलसाठी एजन्सी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट चे सेफ्टी अँड होमोलोगेशन डिपार्टमेंटचे मुख्य एस. एन. ढोले कार्य करत आहेत. 2 दिवस ट्रायल झाल्यांनतर आर्थिक टेंडर उघडण्यात येईल आणि मग एजन्सी अंतिम करण्यात येईल. इलेक्ट्रिक बससाठी नागरिकांकडून डिझाईन मागवले जातील. एजन्सी ठरल्यावर नव्याने येणाऱ्या इलेक्ट्रिक बसेस दिसण्यात कशी असावी यासाठी नागरिकांकडून डिझाईन मागवले जाणार आहेत. यामुळे बसची लोकसहभागाद्वारे ठरली जाणार आहे. जी डिझाईन निवडण्यात येईल त्याचासाठी आकर्षक पारितोषिक दिले जाईल. ही स्पर्धा लवकरच नागरिकांसाठी सुरू केली जाईल, असे प्रशासकांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com