औरंगाबादकरांसाठी 'स्मार्ट' हेल्पलाईन; 24X7 मदतीसाठी डायल करा...

Helpline
HelplineTendernama
Published on

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद स्मार्ट सिटीतर्फे मनपा संबंधित प्रश्नांसाठी आणि सेवेसंबंधित मदतीसाठी 24 तास हेल्पलाईन सोमवारी लॉन्च करण्यात आली आहे. यामुळे शहरातील नागरिकांना आता 24 तास मदतीचा हात उपलब्ध असणार आहे. हा उपक्रम स्मार्ट सिटीच्या ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत उपलब्ध करून देण्यात आला आहे. (Aurangabad Smart City Helpline)

Helpline
वांद्रे टर्मिनस ते खार रोडला जोडणारा 'तो' पूल खुला!

मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद स्मार्ट सिटीने नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा ई-गव्हर्नन्स प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाद्वारे सेवेचा अधिकार अधिनियम अंतर्गत मनपा संबधित सर्व सेवा नागरिकांना जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम रित्या उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नागरिकांना मनपाकडून पुरवल्या जाणाऱ्या सेवेबद्दल काही प्रश्न असतील किंवा मदतीची गरज असेल तर नागरिक कुठल्याही वेळी 8069092200 या हेल्पलाईन वर संपर्क साधू शकतात. सोमवारी औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या मुख्यालयात मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटी सीईओ आस्तिककुमार पांडेय यांच्या हस्ते ही हेल्पलाईन लॉन्च करण्यात आली. यावेळी त्यांनी स्वतः या हेल्पलाईन वर संपर्क साधून चाचणी केली.

Helpline
औरंगाबादेत एकाच ठेकेदाराला दोन्ही टेंडर देण्यासाठी नियमांना बगल?

या हेल्पलाईन वर नागरिक स्वच्छता, पाणी पुरवठा, पथदिवे, ड्रेनेज किंवा कर भरणे संबधित प्रश्नांसाठी व मदतीसाठी कॉल करू शकतात. एकदा कॉल केल्यावर मनपा प्रतिनिधी नागरिकांचे प्रश्न किंवा समस्येची ऑनलाइन नोंद करून घेतील आणि लगेच निवारण होत नसेल तर संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्याला यासाठी नेमण्यात येईल, स्मार्ट सिटीचे प्रकल्प अभियंता फैज अली यांनी सांगितले. ठराविक वेळेवर निवारण झाले नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्याकडे ती समस्या जाईल. या हेल्पलाईनचे संचालन स्मार्ट सिटीच्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर येथून करण्यात येईल.

Helpline
महामेट्रोची विक्रमी भरारी; 'हे' प्रकल्प आशिया-इंडिया बुकमध्ये

यावेळी स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, उपायुक्त संतोष टेंगळे, नगररचना विभाग प्रमुख ए. बी. देशमुख, उपायुक्त नंदा गायकवाड, उपायुक्त सोमनाथ जाधव, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा, स्मार्ट सिटीचे सेक्टर लीड एम. बी. काझी, प्रकल्प अभियंता फैज अली, प्रकल्प सहयोगी किरण आढे, माध्यम विश्लेषक अर्पिता शरद उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com