अखेर शिक्कामोर्तब!; स्मार्ट रस्त्यांच्या कामात नियमांना बगल

Aurangabad
AurangabadTendernama
Published on

औरंगाबाद (Aurangabad) : शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या जवाहरनगर पोलिस स्टेशन-टिळकपथ या निकृष्ट पद्धतीने होत असलेल्या व्हाइट टाॅपिंग रस्त्याबाबत 'टेंडरनामा'ने वृत्तमालिका प्रकाशित केली. त्यात इतर होत असलेल्या इतर २१ रस्त्यांबाबतही शंका उपस्थित केली. यावर प्रतिनिधीने स्मार्ट सिटीचे डेप्युटी सीईओ सौरभ जोशी यांना येथील निकृष्ट रस्ते कामाचे सचित्र वृत्त मालिका पाठवत थेट सवाल केला होता. त्यानंतर जोशी यांनी स्वतः रस्त्याची पाहणी करून येथील रस्त्याचे छायाचित्र आयआयटीकडे रवाना केले होते. मात्र 'टेंडरनामा'ने वृत्तमालिकेचा पाठपुरावा सुरूच ठेवला होता. त्यावर आयआयटीच्या अहवालानंतर सीईओंच्या आदेशाने संबंधित ठेकेदारावर निश्चित कारवाई होणार, अशी ग्वाही जोशी यांनी दिली होती. 'टेंडरनामा' वृत्तमालिकेनंतर आयआयटीच्या पथकाने जवाहरनगर पोलिस स्टेशन-टिळकनगरसह इतर रस्त्यांचा अहवाल अहवाल स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सीईओ तथा मनपा प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांच्याकडे दिला आहे. त्यात रस्ते कामात आयआरसीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Aurangabad
औरंगाबादेत स्मार्ट रस्त्यांचा काळाबाजार; पायाने उकरला जातोय रस्ता

मनपा प्रशासनाने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत केंद्र व राज्य तसेच मनपाच्या हिश्श्यातून सुरुवातीला  ३१७ कोटींतून १११ रस्त्यांची कामे करण्याचे नियोजन केले होते. स्मार्ट सिटीतून होत असलेल्या या रस्त्यांचे कंत्राट सर्वात कमी टक्के दराने टेंडर भरणाऱ्या औरंगाबादेतील एजी कन्सट्रक्शन कंपनीला देण्यात आलेले आहे. या रस्त्यांच्या नियमित देखभालीसाठी औरंगाबादच्याच समीर जोशी यांच्या यश इनोव्हेशन सोल्युशन कंन्सलटन्स कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. याशिवाय रस्त्यांचा तांत्रिक दर्जा तपासण्यासाठी त्रयस्त समिती म्हणून मुंबईच्या आयआयटीची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, तत्कालीन प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या बदलीनंतर प्रशासक म्हणून डॉ. अभिजित चौधरी यांनी पदभार घेतला. त्यांनी चौकशी केल्यानंतर स्मार्ट सिटीतून रस्ते कामासाठी निधीच शिल्लक नसल्याने त्यामुळे ३१७ कोटींतील १११ पैकी केवळ २२ रस्त्यांचीच कामे करण्याचा निर्णय तत्कालीन प्रशासकांनी देखील घेतल्याचे त्यांनी दिलेल्या एकापत्राद्वारे चौधरींच्या समोर आले. तोच निर्णय कायम करण्यात आला. त्याच निर्णयानुसार कंत्राटदाराने रस्त्यांची कामे सुरू केली. 

Aurangabad
औरंगाबाद : 'त्या' पुलाचे सदोष डिझाइन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

दरम्यान 'टेंडरनामा' प्रतिनिधीकडे या रस्त्यांच्या कामाबाबत शहरातील काही सेवानिवृत्त अभियंते व सुजान जेष्ठ नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला. चमुने काही अभियंत्यांसह जवाहरनगर पोलिस स्टेशन ते टिळकनगर रस्त्याची पाहणी केली. त्या वेळी व्हाईट टाॅपिंगचे काम डांबरीकरणापेक्षा महाग पडत असले तरी त्याचे आयुर्मान जास्त असल्यामुळे ते करण्याचा सरकारचा आदेश आहे. पण हे काम करताना पूर्वीचे डांबरी रस्ते जेसीबीच्या पात्याने ओरबाडून त्यावरच काँक्रिटचे ढोबळमानाने थरावर थर ठेवत रस्त्यांची उंची वाढवली जाते. यामुळे जोडरस्ते खाली दाबले जातात व नव्या अतिउंचीच्या रस्त्यापासून जोड रस्त्याकडे जाताना मोठे चढ उतार तयार होतात. पावसाळ्यात पाण्यामुळे रस्ते तुंबुन खराब होतात. यासाठी रस्त्यांचे पुरेपुर खोदकाम करून जोड रस्त्यांच्या लेव्हलपर्यंत पुढील काम केले जावे, असे मत एका तज्ज्ञाने व्यक्त केले. 

रस्त्यांचे काम करण्याआधी वाहतूक क्षमतेनुसारच व्हाईट टाॅपिंग रस्त्यांचे डिझाईन करणे अपेक्षित आहे. त्यानुसार खडीचा आकार ठरवून अर्थात एम-४० पेक्षा अधिक व २७० ते ३०० एमएम जाडीचे काँक्रिट डिझाईननुसार केले जाते. मात्र हे सर्व करित असताना बांधकाम होत असलेल्या डिझाईन नुसार मिक्स डिझाईन ऑफ काॅक्रीट आणि त्यात सिमेंट आणि पाण्याचे प्रमाण, दबाई आणि प्राॅपर क्युरिंगकडे लक्ष देणे गरजेचे असते. दरम्यान, जवाहरनगर पोलिस स्टेशन ते टिळकनगर रस्त्याची बारकाईने पाहणी करताना चुकीचे मिक्स डिझाईन, सिमेंट कमी आणि पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने सिमेंट सलरी रूपात वाहून गेल्याने पृष्ठभाग खडबडीत झाला असावा तसेच रस्त्याचे काँक्रिट करताना क्युरिंग योग्य रित्याने झालेले नसावे व काँक्रिट रस्ता क्युरिंग पिरेड आधीच वाहतूकीसाठी खुला केल्याने रस्त्याची दुर्दशा झाल्याचे मत दुसऱ्या तज्ज्ञाने व्यक्त केले. यात रस्त्याचे डिझाईन करताना योग्य रित्या वाहतूक सर्वेक्षण झाले नसल्यानेच रस्त्याचे डिझाईन चुकल्याचे तिसर्या तज्ज्ञाने ठामपणे मत व्यक्त केले. यात डिझाईनप्रमाणे सदोष बांधकाम साहित्याचा वापर केल्याचे मत चौथ्या तज्ज्ञाने व्यक्त केले.

Aurangabad
औरंगाबाद : खड्डा बुजवताना 'एमआयडीसी'च्या अधिकाऱ्यांकडून काळाबाजार

'टेंडरनामा'च्या वृत्तमालिकेनंतर आयआयटीचे प्राध्यापक तथा रोडतज्ज्ञ डॉ. धर्मवीरसिंग यांच्या पथकाने रस्त्यांची पाहणी केली. त्यांनी नुकताच ३६ पानी अहवाल स्मार्ट सिटीच्या सीईओंना  दिला आहे. यात इंडियन रोड काँग्रेस सेक्शन एस. पी. ८३ मधील विविध नियमांचे पालन करण्याचे सूचित केले आहे. या नियमांचे तंतोतंत पालन केले तर औरंगाबाद शहरातील हे रस्ते उत्कृष्ट मॉडेल म्हणून तयार होतील, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी प्रत्येक रस्त्यातील बारीकसारीक चुकांवर बोट ठेवत सूचना केल्या आहेत.

काय आहे अहवालात

● रस्ते कामांतील काही बाबींमध्ये आयआरसी (इंडियन रोड काँग्रेस) नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवला आहे.

● आयआरसी नियमांचे तंतोतंत पालन केल्यास स्मार्ट सिटीअंतर्गत होणारे हे रस्ते राज्यात एक मॉडेल बनतील, असेही मुंबई आयआयटीने नमूद केले आहे

काय दिल्या सूचना

● नव्यानेच तयार झालेल्या रस्त्यांच्या भेगा एका विशिष्ट दर्जाच्या सिमेंटने भरावेत

● जवाहरनगर पोलिस स्टेशन ते टिळकनगर रस्त्यासह इतर रस्त्यांचा खराब झालेला पृष्ठभाग बदलावा.

● काँक्रिट करताना रस्त्यांचा पृष्ठभाग गुळगुळीत करण्यावर भर द्या. काम सुरू असताना सूचना फलकांचा पुरेपुर वापर करा.

● काँक्रिटीकरण पंक्चर करताना गृव्हकटींग मशीनचा योग्य वापर करा जाईंटकट मारा.

● पृष्ठभाग गुळगुळीत करण्यासाठी योग्य मशिनरीचा वापर करावा

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com