Aurangabad : हायकोर्टासमोर G-20चे ब्रँडिंग अन् होर्डींग पाठीमागे..

Aurangabad
AurangabadTendernama
Published on

औरंगाबाद (Aurangabad) : सिडकोतील उच्च्य न्यायालयाच्या न्यायमूर्ती निवासस्थानांच्या सुरक्षाभिंतीलगत जालनारोड महापालिका हद्दीतील ग्रीनबेल्टसमोर G-20 ची ब्रेंडींग करणारे दहा ते बारा फुटाचे होर्डींग महापालिकेच्या टेंडर प्रक्रियेत यशस्वी झालेल्या ठेकेदाराकडून लावण्यात आले आहेत. मात्र, या होर्डींगच्या पाठीमागेच असलेल्या ग्रीनबेल्टमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. पाण्याअभावी चांगली जीवंत झाडी वाळलेली आहेत. गवत आणि रानटीझुडपात त्यांची वाढ खुंटलेली आहे. आता होर्डींगचा आडोसा घेत पादचारी आणि वाहनधारक उघड्यावर लघुशंका करत आहेत. तर याच होर्डींगच्या पुढे जुनाट बसथांबा G-20च्या ब्रँडिंग शोभा घालवत आहे. महापालिकेचा असा जुगाडू कारभार पाहुन कशी उंचावणार शहराची प्रतिमा, असा सवाल टेंडरनामाच्या पाहणीत उपस्थित होत आहे. तेही थेट उच्च न्यायालयासमोरचा असा फसवा कारभार पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Aurangabad
Mumbai : बीएमसीचे लवकरच 2 हजार सुरक्षारक्षक पुरवठा टेंडर

जालनारोडलगत उच्च न्यायालयाच्या शेजारीच न्यायमुर्तींचे निवासस्थाने असलेल्या न्यायमुर्तीनगराच्या सुरक्षाभिंतीला खेटूनच येथे ग्रीनबेल्ट आहे. याच ग्रीनबेल्टच्या दर्शनी भागात जुनाट बस स्टॉप आहे. तसेच हा रामा इंटरनॅशनल हाॅटेलसमोरचाच भाग आहे. याच प्रमुख जालना रस्त्यावरून विदेशी पाहुण्यांची ये-जा होणार आहे. दोन दिवसात शहरात विदेशी पाहुण्यांचे आगमण होणार आहे. संपुर्ण औरंगाबादकरांना विदेशी पाहुण्यांच्या स्वागताची कुतुहल लागली आहे. त्यांच्या स्वागतासाठी कधी नव्हते ते रस्ते चकाचक करण्यात आले आहेत. सुशोभिकरणासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला आहे.

Aurangabad
Aurangabad : उकीरडा लपवण्यासाठी तब्बल 17 लाखांचे टेंडर

समोर पाहुण्यांचा मुक्काम तिकडेच महापालिकेची बनवाबनवी

ज्या परिसरात पाहुण्यांचा मुक्काम आहे. त्याच परिसरात जालना रस्त्यालगत न्यायमुर्तीनगराच्या समोर G-20 च्या ब्रँडिंगच्या होर्डींगमागे ग्रीन बेल्टमध्ये या होर्डींगचा आधार घेत स्काय टू ओपन शौचालय झाले आहे. एवढेच नव्हेतर तेथे नव्याने मिनी डम्पिंग ग्राउंड तयार झाले आहे. त्या ठिकाणी आधीच बकाली त्यात नव्याने डेब्रीजच्या गोणी, कचरा, टाकण्यात आला आहे. त्या ठिकाणी कचर्‍याचे ढीग सडत असून, होर्डींग लावण्यापूर्वी त्याकडे महापालिका प्रशासनाने आणि संबंधित ठेकेदाराने स्वच्छतेकडे का दुर्लक्ष केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

Aurangabad
Aurangabad: ठेकेदाराचा उरफाटा कारभार; रंगरंगोटी करून फासले काळे?

पालिका प्रशासक तुम्ही सुद्धा?

विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वीच महापालिका प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांनी शहर अभियंता ए. बी. देशमुख, कार्यकारी अभियंता भागवत फड, उद्यान व वृक्षप्राधिकरण अधिकारी डाॅ. विजय पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सोमनाथ जाधव व इतर अधिकार्यांसोबत तब्बल चार तास जालनारोडची पाहणी केल्याचा गाजावाजा केला होता. मग हे महत्वाचे ठिकाण टेंडरनामालाच दिसू शकते, महापालिका प्रशासकांना का नाही, याअर्थी प्रशाहकांच्या पाहणी दौऱ्यातच गरबड झाल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. आता आम्ही सचित्र ही बाब आपणासमोर मांडत आहोत. आता तरी तेथील बकाली उचलून आणि जुनाट थांब्याचे रूपडे पालटण्यात यावे, कचरा उचलण्यात यावा तसेच या ठिकाणची पाहणी करून तेथे सौंदर्यबेटासाठी प्रयत्न करावेत.

Aurangabad
Aurangabad: का सुरू आहे चकचकीत रस्त्याचे खोदकाम? मनपाचा गजब कारभार

प्रशासक साहेब हे कधी शोधणार?

१५ जुलै २०१९ रोजी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलोपमेंट कार्पोरेशनकडून मुंबईच्या प्रोॲक्टीव्ह इन ॲन्ड आऊट ॲडव्हरटायजिंग प्रा. लि. कंपनीला स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात ६८ आणि दुसऱ्या टप्प्यात ८२ स्मार्ट बसथांबे उभारण्याची वर्क ऑर्डर दिली होती. या कंपनीने जिथे जाहिरातीचा धंदा जोमात अशा ठिकाणी थांबे उभारले. एकीकडे तो मालामाल होत असताना वार्षिक भाडे ४८ लाख ६० हजार प्रमाणे व वार्षिक दरवाढनुसार आजपर्यंत भाडे दिले नाही. त्यात जालनारोडच नव्हेतर जळगावरोडसह अनेक मुख्य रस्त्यावर असे जुनाट बसथांबे कोट्यावधीच्या सुशोभिकरणाची शोभा घालवत आहेत. यासाठी प्रशासकांनी याला जबाबदार असणार्या स्मार्ट सिटी कारभाऱ्यांना सवाल करत ठेकेदाराच्या कामाची तपासणी करणे गरजेचे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com