Sambhajinagar : कोट्यावधीचे रस्ते चकाचक पण दिशादर्शक फलक विद्रूप

Aurangabad
AurangabadTendernama
Published on

संभाजीनगर (Sambhajinagar) : विदेशी पाहुण्यांच्या ये-जा करणाऱ्या मुख्य रस्त्यावरील दुभाजकात प्रत्येक चौकात लावलेले दिशादर्शक फलक गंजलेले आहेत, काही वर्षानुवर्ष वारा-वादळाने दिशाहीन झालेले आहेत. काहींचे पार तुकडे होउन अक्षरे गायब झाली आहेत. तर काही झाडात झाकोळले आहेत, काही बेरंग झाले आहेत. अशावेळी विदेशी पाहुण्यांची ने-आण करणाऱ्या नवख्या चालकांची फसगत होऊ शकते. चार दिवसापूर्वी ओव्हरहेड केबलमुळे विद्रुपीकरण होत असल्याचे पाहून ती भूमिगत करण्याचे आदेश देणाऱ्या महापालिका प्रशासकांना हे विद्रुप दिशादर्शक फलक दिसू नयेत, हे विशेष.

Aurangabad
Mumbai : पनवेल-कर्जत रेल्वेचे काम मिशन मोडवर; बोगद्यासाठी टेंडर

शहरात विदेशी पाहुणे येणार आहेत. दोन दिवस ते विविध पर्यटनस्थळांना भेटी देणार आहेत. यानिमित्त त्यांची शहरभ्रमण होणार आहे. दरम्यान स्वागतासाठी त्यांच्या ये-जा करणारे मुख्य रस्ते गुळगुळीत करण्यात आले. G-20 च्या विशेष निधीतून यासाठी कोट्यावधी रूपये खर्च करून रस्त्याचे काम ठेकेदारामार्फत पूर्णत्वाकडे नेण्यात आले. पण संबंधित विभागाने या रस्त्यांचे काम करताना दिशादर्शक फलकांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांची दयनीय अवस्था जैसे थे आहे.

Aurangabad
Aurangabad : शिवाजीनगर भुयारी मार्ग; मुल्यांकनाला सरकारची मंजुरी

मुळात G-20 च्या निधीत रस्त्ता दुरूस्तीची कामे करताना टेंडरमध्ये रोड फर्निचरचा देखील उल्लेख होता. यात दिशादर्शक फलकाचा देखील समावेश असताना संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी ठेकेदारांच्या कामांकडे सोयीस्करपणे अर्थपुर्ण दुर्लक्ष केल्याचा संशय बळावत आहे. प्राप्त तक्रारीनुसार प्रतिनिधीने मुख्य रस्त्यांची पाहणी केली असता शेंद्रा एमआयडीसी ते वाळुज, नगरनाका ते वेरूळ, सिडको टी पाईंट ते हर्सुल, हर्सुल टी पाॅईंट ते व्हीआयपी मार्गावर सगळीकडे विद्रुप दिशादर्शक फलक झालेले दिसले. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com