टेंडरनंतरही औरंगाबादेतील रस्त्यांवरील दुभाजक, फुटपाथ कागदावरच

Footpath

Footpath

Tendernama

Published on

औरंगाबाद (Aurangabad) : शहरातील काही मुख्य रस्त्यावर दुभाजक आणि फुटपाथ बांधण्याबाबत टेंडरनामाने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर औरंगाबाद महापालिकेने निर्णय घेतला. शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण केले, 20 कोटी रूपयाचे अंदाजपत्रक तयार केले आणि 31 किमीच्या रस्त्यावर दुभाजक आणि फुटपाथ उभारण्याची ही घोषणा मात्र हवेतच विरली. अद्यापही दुभाजक आणि फुटपाथ कागदावरच आहेत. यासंदर्भात महापालिका कार्यकारी अभियंता भागवत फड यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.

Footpath

पनवेल ते कर्जत थेट लोकल; २ हजार ७८३ कोटींचा खर्च

शहरातील ‌विविध भागात दुभाजकांची दुरवस्था झाली आहे. वाहनधारक दुभाजकातील गॅपचा वापर शॉर्टकटसाठी करीत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. काही ठिकाणी आरसीसी रस्त्यांच्या कामात तर दुभाजक जमीनदोस्त झाले असून त्यांच्या अवशेषांच्या खुणा ‌शिल्लक आहेत. विशेषतः सेवनहील उड्डाणपुलावरील दूभाजकाच्या लोखंडी जाळ्याच गायब करण्यात आल्या आहेत. सिडकोतील वोक्हार्ट चौकात तर दूभाजकाचा कोथळाच रस्त्यावर पडून असल्याने वाहनांना वळण घेताना त्रास होत आहे. याकडे महापालिकेसह एमएसआरडीसी, सिडको, पीडब्लुडी आणि एनएचआयएतील सबंधित अधिकारी मात्र सर्रासपणे डोळेझाक करीत असल्याचे दिसत आहे.

Footpath

बसपोर्ट प्रकरण; सिडको प्रशासकासह तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

शहरातील दुहेरी रोडवर वाहनधारकांच्या सोयीसाठी दुभाजक टाकण्यात आले आहेत. शहरातील विविध भागात हे दुभाजक दिसून येतात. सध्या मात्र अनेक ठिकाणी दुभाजकाची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी वाहनधारकांनी आपल्या सोयीसाठी दुभाजक तोडून गॅप निर्माण केला आहे.

अपघाताचा धोका

रस्त्यावरून वाहतूक करताना चौक किंवा वळण आल्यास वाहनधारक त्याचे वाहन सावकाश व काळजीपूर्वक चालवतो. मात्र, दुभाजकामध्ये असलेल्या गॅपमधून अचानक वाहनधारक समोर आल्यास सरळ जाणारा वाहनधारक गडबडून जातो. या प्रकाराने अनेकदा अपघात झालेले आहेत. याचाच परिणाम म्हणून गत दहा वर्षात 48 मृत्यू आणि अनेक लोक अंथरूणावर खितपत पडले आहेत.

Footpath

EXCLUSIVE : मुंबई म्हाडा सभापतीपदावरुन राष्ट्रवादीत घमासान

जमीनदोस्त झालेले दुभाजकही धोकादायक

शहरात अनेक ठिकाणी टाकण्यात आलेले दुभाजक तुटले असून काही भागात आरसीसी रस्त्यांच्या बांधकामात जमीनदोस्त झाले आहेत. मात्र, काही ठिकाणी त्याचे अवशेष तसेच बाकी आहेत. वाहनधारकांना वाहतूक करताना अनेकवेळा हे लक्षात येत नाही. परिणामी दुभाजकाच्या अवशेषांवर आदळून वाहनांचे अपघात घडण्याचेही प्रकार घडत आहेत.

संबंधित यंत्रणा निद्रिस्त

शहरात दुभाजक टाकण्याचे काम मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे. अनेकवेळा रस्त्यांची डागडुजी होते, परंतू दुभाजकांची दुरवस्था कायम राहते. या दुभाजकांची देखील वेळोवेळी डागडुजी करणे गरजेचे आहे. ज्या दुभाजकामध्ये नागरिकांनी सोयीनुसार गॅप तयार केले आहेत. ते गॅप बंद केल्यास हा अपघाताचा धोका टळू शकेल.

Footpath

औरंगाबाद 'कर'दात्यांवर दिवसा धूळफेक

यांनी केले उद्योग

बहुतांश दुभाजक हे पेट्रोलपंप, कोचिंग क्लासेस, हॉस्पिटल, हाॅटेल्स, दुकाने व मंगल कार्यालयासमोर तोडून गॅप निर्माण करण्यात आले आहेत. यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. प्रशासनाने यावर कारवाई करणे गरजेचे आहे.

असा होतो परिणाम

रस्त्यावरून सरळ दुचाकी चालवत असताना अचानक दुभाजकाच्या गॅपमधून एखादे वाहन ‌आल्यास वाहनधारकांची तारांबळ उडते. बेशिस्त वाहनधारकामुळे अपघाताच्या घटना घडतात. यावर पोलिसांकडून कारवाई अपेक्षित आहे.

कोट्यावधींचा निधी; ओबडधोबड रस्ते

शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी सरकारने आतापर्यंत भरीव निधी दिला. पहिल्या टप्प्यात २५ कोटींचा निधी देण्यात आला, त्यातून पाच रस्त्यांची कामे करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात शंभर कोटींचा निधी देण्यात आला, त्यातून तीस रस्त्यांची कामे करण्यात आली. तिसऱ्या टप्प्यात १५२ कोटींचा निधी देण्यात आला आहे, त्यातून २३ रस्त्यांची कामे केली जात आहेत.

Footpath

औरंगाबाद खड्ड्यात; महापालिकेने केली औरंगाबाद खंडपीठाची दिशाभूल

रोड फर्निचरच्या कामाकडे दुर्लक्ष

सरकारच्या निधीतून रस्त्यांची कामे करताना महापालिकेने रोड फर्निचरच्या कामाकडे लक्ष दिले नाही. सरसकट रस्ते बांधणीची कामे करण्यात आली. बहुतेक रस्त्यांची कामे सिमेंट काँक्रिटच्या माध्यमातून करण्यात आली आहेत. रस्त्यांची कामे करताना सांडपाणी वाहून जाण्यासाठी साइड ड्रेन करणे गरजेचे असते, वाहतूक सुरळीत चालावी, अपघात होऊ नयेत म्हणून दुभाजक बांधावे लागतात. रस्त्यांवरुन पायी जाणाऱ्यांसाठी फुटपाथ बांधावे लागतात. या कामांकडे पालिकेने दुर्लक्ष केले आणि केवळ ओबडधोबड रस्ते बांधणीचे काम केले.

पंधराव्या वित्त आयोगाचे गाजर

टेंडरनामाने शहरातील या ओबडधोबड कामांवर प्रहार केला दरम्यान महापालिकेला पंधराव्या वित्त आयोगातून ६३ कोटी २० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. आहे. यातून रस्त्यांवर दुभाजक बांधणे व फुटपाथ तयार करणे यासाठी वीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे गाजर प्रशासक पांण्डेय यांनी दाखवले होते.

Footpath

औरंगाबाद : चिकलठाणा, बाबा पेट्रोल पंप ते वाळूजपर्यंत एकच उड्डाणपूल

आकर्षक दुभाजकांसाठी 20 कोटीचे अंदाजपत्रक

यात शहरातील ३१.६० किलोमीटरच्या रस्त्यांवर पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून दुभाजक तयार केले जाणार असल्याचे म्हणत सिद्धार्थ उद्यान ते भडकल गेट या दरम्यान ज्या पद्धतीने दुभाजक तयार करण्यात आला आहे, त्याच पद्धतीचे दुभाजक डोळ्यासमोर ठेऊन 20 कोटीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. त्यात रंगीबेरंगी फुलांची, शोभेची झाडे लावली जाणार असल्याचे नमुद केले. यापैकी तीन रस्त्यांसाठी फुटपाथदेखील तयार केले जाणार असल्याचे सांगितले.

टेंडरनंतर काय झाले अधिकारी बोलायला तयार नाही

दरम्यान दिड महिन्यापूर्वी टेंडर प्रक्रिया देखील पार पडली पण पुढे काय झाले यावर आता महापालिकेचे कार्यकारी अभियंता भाष्य करायला तयार नाहीत. त्यामुळे महापालिकेची बाजू समजू शकली नाही.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com