औरंगाबाद : MSRTC-महापालिकेच्या वादात नवे स्मार्ट बसस्थानक कागदावरच

Aurangabad Bus Stand
Aurangabad Bus StandTendernama
Published on

औरंगाबाद (Aurangabad) : मध्यवर्ती बसस्थानकाची जुनी इमारत पाडून स्मार्ट बसस्थानक उभारणीसाठी शासनाने २०१९ मध्ये १८ कोटी रुपये मंजूर केले होते. यासाठी मुंबईच्या शशी प्रभू कंपनीची प्रकल्प सल्लागार म्हणून निवड करण्यात आली होती. टेंडर काढून औरंगाबादच्या हायटेक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला हे काम देण्यात आले होते. त्याला दिलेल्या बारा महिन्यांच्या मुदतीत २८ प्लॅटफार्म, चित्रपटगृह, खुले उपाहारगृह इत्याची आधुनिक सुविधा उपलब्ध होणार होत्या. मात्र महापालिका आणि एसटी महामंडळाच्या बांधकाम परवाना शुल्कच्या वादात अद्यापही 'स्मार्ट' बसस्थानक कागदावरच आहे.

Aurangabad Bus Stand
स्पाॅट पंचनामा : अडीच कोटींच्या शिवसृष्टीत निकृष्ट साहित्याचा वापर

पन्नाशी ओलांडलेल्या औरंगाबाद बसस्थानकाची इमारत मोडकळीस आली आहे. त्यामुळे ही इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. तब्बल साडेचार एकर जागेवर नवीन मध्यवर्ती बसस्थानक उभारले जाणार असल्याची घोषणा १५ जून २०१९ मध्ये करण्यात आली होती.

भविष्यातील स्मार्ट सिटी व लोकसंख्या वाढीचा विचार करून मध्यवर्ती बसस्थानकाचे डिझाईन तयार करण्यात आले. बसस्थानकावर नव्हे तर विमानतळावर आल्यासारखे प्रत्येकाला वाटेल व औरंगाबादकरांना अभिमान वाटेल, असे बसस्थानक निर्मितीसाठी मुंबई येथील मे. शशीप्रभू आर्किटेक कंपनीचे अजय ठाकूर या वास्तुविशारदाची नियुक्ती केली. त्यांनी दिलेला 'स्मार्ट' बसस्थानक उभारणीचा नकाशा व प्राथमिक अंदाजपत्रकास शासनाने प्रशासकीय मान्यता देखील दिली होती. त्यानंतर बसस्थानकाचे सविस्तर अंदाजपत्रकाचे काम पूर्ण करण्यात आले होते.

Aurangabad Bus Stand
खड्डे बुजवण्यासाठी बीएमसीचे टेस्टिंग; 'या' तंत्रज्ञानाचा वापर

सविस्तर प्रकल्प विकास आराखड्यात 'स्मार्ट' बसस्थानकाची अद्ययावत नवीन इमारत इंग्रजी 'वाय' या आकारात दर्शविण्यात आली होती. बसस्थानकाचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला दाखविण्यात आले होते. अत्यंत प्रशस्त व देखणे असलेल्या या प्रवेशद्वारात ऐतिहासिक शहराची ओळख जपत या प्रवेशागृहाच्या दक्षिण व उत्तर बाजुला येथील बीबी का मकबरा, पाणचक्की, शहरातील दरवाजे, देवगिरी किल्ला, जागतिक वारसा असलेले वेरूळ-अजिंठा लेणी आणि सोनेरी महलाचे सर्वांना दर्शन होईल, अशा फायबर म्युरलमध्ये या प्रतिकृती बनविण्यात येणार होत्या.

Aurangabad Bus Stand
जपानी तज्ज्ञ रोखणार का कात्रजचा बोगदा कोसळण्यापासून?

सध्याच्या बसस्थानकात १७ प्लॅटफार्म आहेत. मात्र, नवीन बसस्थानकात २८ प्लॅटफार्मचा समावेश करण्यात आला होता. प्रथम दोन्ही बाजूस प्रत्येकी ८-८ प्लॅटफार्म, त्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह तसेच पुढील बाजूस प्रत्येकी ६-६ प्लॅटफार्म व त्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह. मध्यभागी मुख्य नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम), येथून सर्व २८ प्लॅटफार्म दिसू शकतील, अशी रचना या कक्षाची करण्यात आली होती. आसपास १२ छोटी दुकाने उभारण्यात येणार होती, तसेच विनावाहक गाड्यांच्या तिकिटासाठी ४ स्वतंत्र खिडक्यांची व्यवस्था. हे सर्व प्लॅटफार्म छताने अच्छादित करणार होते. या मॉडर्न मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रस्तावित इमारतीसाठी १८ कोटी २९ लाखांची मंजुरी राज्य शासनाने दिली होती.

Aurangabad Bus Stand
पुणे-बेंगळुरू 'ग्रीनफिल्ड'मुळे प्रवास ५ तासांनी कमी; विमानासाठीही

दोन ठिकाणी वाहनतळे

बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांसाठी दोन ठिकाणी सुमारे सव्वा एकर जागेवर वाहनतळ करण्यात येणार होता. आप्तेष्टांना बसमध्ये बसवून त्वरित निघून जाणाऱ्या वाहनधारकांच्या दुचाकी व चारचाकीसाठी बसस्थानकाच्या समोरील बाजूस वाहतळ असणार होते. वाहन उभे करून गावाला जायचे आहे, अशांसाठी बसस्थानकाच्या उत्तरेस (जिथे निवासस्थाने होती) वाहनतळ असेल. त्याच ठिकाणी समोरील बाजूस रिक्षास्टँडसाठी जागा ठेवण्यात आली होती. बसस्थानकामधून उत्तर बाजूस वाहनतळामध्ये वाहन घेण्यासाठी प्रवाशांना जाण्यासाठी भुयारी मार्ग करण्यात येणार होता.

Aurangabad Bus Stand
मोठी बातमी : मुंबई मेट्रोचे कारशेड आरेमध्येच; शिंदेंनी बंदी उठवली

पाणी फेरभरण

संपूर्ण बसस्थानकाचे पाणी फेरभरण करण्यात येणार होते. यासाठी अंडरग्राऊंड वॉटर टँक करण्यात येणार होता. पावसाळ्यात जमा झालेल्या पाण्यावरच वर्षभर बसस्थानकात पाणी पुरविले जाणार होते. याशिवाय बसस्थानकात ग्रीन बिल्डिंगची संकल्पना राबविण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता.

पहिला मजला चित्रपटगृह

पहिल्या मजल्यावर उत्तर दिशेला १०० ते १२० आसनक्षमतेचे चित्रपटगृह संकल्पीत केले होते. तर दक्षिण बाजूस वाहक व चालकांना राहण्यासाठी प्रशस्त हॉल, अकाऊंट कार्यालय असेल. तसेच वाहक-चालकांच्या खुली व्यायामशाळा, इनडोअर गेम्स, तसेच खुले उपहारगृह होणार होते.

मात्र, जुन्या बस स्थानकाला ५० वर्षे होऊन गेल्यानंतरही औरंगाबादकरांना असलेली नव्या, अत्याधुनिक बस स्थानकाची प्रतिक्षा संपलेली नाही. अद्यापही नव्या बस स्थानकाचा आराखडा कागदावरच आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com