Aurangabad: कोणी अडवली औरंगाबादच्या विकासाची वाट? जाणून घ्या कारण

Aurangabad Road Work
Aurangabad Road WorkTendernama
Published on

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबादेत महापालिका (AMC) आयुक्त येतात, शहर विकास आराखड्यानुसार रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतात. प्रत्यक्षात घरे पाडली जातात कोट्यवधीच्या जागेवर ताबा घेतला जातो. पण महापालिकेची रस्ता रुंदीकरणाची मोहीम काही फत्ते होत नाही. यामुळे शहराच्या औद्योगिक विकासाला (Industrial Development) मोठे ग्रहण लागले आहे.

Aurangabad Road Work
Nashik: त्र्यंबकेश्वर देवस्थानचा 'या' कारणांमुळे बदलणार चेहरामोहरा

यात लोकप्रतिनिधी, मालमंत्ताधारक आणि महापालिका प्रशासनाने एकमेकांत विश्वासाचा समन्वय ठेवला, तर अशक्यही शक्य होईल. देश-विदेशातील उद्योजकांच्या नजरा खऱ्या अर्थाने या शहराकडे लागतील. विदेशी पाहुणे येणार म्हणून त्याच मार्गावर झगमगाट करणे म्हणजे त्यांच्या डोळ्यात निव्वळ धुळफेक आहे. खऱ्या अर्थाने संपूर्ण औरंगाबादचे वास्तव बदलणारा प्रशासक आणि लोकप्रतिनिधींनी या शहराचा चेहरा बदलण्यासाठी गरच आहे. 

Aurangabad Road Work
Pune News: पुणे विमानतळावरील पार्किंगबाबत मोठा निर्णय; आता...

गेल्या दोन आठवड्यांपासून जळगाव रस्त्यावरील सर्व्हिस रोड मोकळा करण्यासाठी पाडापाडी सुरू आहे. मनपाने हर्सुल टी पाॅईंटच्या दिशेने स्मार्ट सिटीप्रकल्पांतर्गत काॅंक्रिट रस्त्याचे काम देखील सुरू केले आहे. शिवाय सर्व्हिसरोड आणि जळगावरोडच्या मधोमध ग्रीनबेल्ट देखील विकसित केला जात आहे. मात्र पुढे जाधववाडीच्या हद्दीत रस्त्याचे भवितव्य धोक्यात आहे. आंबेडकरनगर भागात काही घरे पाडली असली, तरी गरवारे कंपनीने सर्व्हिसरोड वरच झाडे लावली आहेत. पुढे वोक्हार्ट कंपनीने देखील अशाच पध्दतीने सर्व्हिस रोड दाबला आहे.

इंडो-जर्मन समोरील सर्व्हिसरोडवर महापालिकेनेच ग्रीनबेल्ट विकसीत केला आहे. पुढे मात्र सिडको एन - १ ते काळागणपती ते सिडको बसस्थानकापासून एपीआय क्वार्नरपर्यंत सर्व्हिसरोड मोकळा असला, तरी हातगाडीवाल्यांना निम्मा रस्ता ताब्यात घेतला आहे. विशेष म्हणजे सिडको एन - १ पोलिस चौकी ते एपीआय क्वार्नर रस्त्याचे शासन अनुदानातून सहा कोटी रूपये खर्च करून काॅक्रीटीकरण करण्यात आले. त्याचा वाहनधारक आणि पादचार्यांना काही उपयोग होत नाही.

Aurangabad Road Work
BMC Good News: विक्रोळीत कर्मचाऱ्यांसाठी 2 हजार घरे; 537 कोटींचे..

बीड बायपास सर्व्हिसरोडचे भिजत घोंगटे

अनेकांचे बळी घेणाऱ्या बीड बायपासच्या पैठण जंक्शन ते झाल्टा फाटा विकास आराखड्यातील ६० मीटर रूंद सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे काढण्याचे काम सहा वर्षापूर्वी हाती घेण्यात आले होते. त्यात रुग्णालये, मंगलकार्यालये, हाॅटेल्स व दुकानांसह अनेक लवकरच हाती घेण्याचे मनपाने जाहीर केले. मात्र, सद्यस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अस्तित्वातील ३० मीटर रस्त्यावरच दोन्ही बाजुने साडेसहा मीटरचा सर्व्हिस रस्ता देत सातारा - देवळाई आणि बीड बायपासकरांची बोळवन केली गेली. महापालिकेने दोन्ही बाजुने सर्व्हिस रस्ता तयार केलाच नाही. 

जयभवानीनगर ते बीड बायपास उड्डाणपूल कागदावरच

दीड वर्षापूर्वी अनेक घरांची अतिक्रमणे जमीनदोस्त केल्यावर जयभवानीनगर - मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन रस्त्याचे रूंदीकरण व  नूतनीकरण केले गेले. परंतु जयभवानीनगर ते बीड बायपास उड्डाणपुल कागदावरच ठेवण्यात आला. सहकारमंत्री तथा आमदार अतुल सावे उद्योगमंत्री असताना त्यांच्या पाठपुराव्याने सिडको बसस्टॅन्ड ते जयभवानी चौक ते बीड बायपास रस्ता रुंदीकरण व पुढे जयभवानीचौक ते बीड बायपास उड्डाणपूल उभारण्याकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची नियुक्ती केली होती. यासाठी १७५ कोटीची घोषणा करण्यात आली होती. मात्र थेट सिडको ते बीड बायपासला जोडणारा उड्डाणपूल कागदावरच राहीला. 

गंजेशहिदा कब्रस्तान ते राजाबाजार

तत्कालीन मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी जुन्याशहरातून सिडको वासीयांची कोंडीतून सुटका व्हावी यासाठी मदानी चौकाकडून थेट संजयनगर - जिन्सी - गंजेशहिदा कब्रस्तान - राजाबाजार या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्याप महापालिकेला जलवाहिनी स्थलांतराला मुहूर्त लागत नसल्याने राजाबाजार - जिन्सीचे काम रखडल्याचे सांगण्यात येत आहे.

Aurangabad Road Work
Bullet Train:सी-2च्या टेंडरसाठी कठोर अटी; कंपन्यांची आर्थिक कोंडी?

४१ वर्षांत दोनच आयुक्तांचे धाडस

औरंगाबाद महानगरपालिकेला ४१ वर्ष पूर्ण झाले. दरम्यान इतक्या वर्षात केवळ डाॅ. पुरुषोत्तम भापकर त्यानंतर ओमप्रकाश बकोरिया या दोनच आयुक्तांनी शहर विकास आराखड्यानुसार जुन्या शहरातील रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली होती. मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी डिसेंबर २०१६ रोजी रस्ता रुंदीकरण मोहीम हाती घेतली होती. बीड बायपास, दमडीमहल ते जालनारोड तसेच राजाबाजार येथील संस्थान गणपती ते गंजे शहिदा मशिदीपर्यंत ५० फूट रुंदीकरणाचे काम हाती घेतले होते. मार्च २०१७ अखेरपर्यंत नवा रस्ता उपयोगात येईल, असा दावा बकोरियांनी केला होता.

यासाठी जवळपास  १४० मालमत्ता पाडण्यात आल्या होत्या. यात काही जणांनी टीडीआर, वाढीव एफएसआयऐवजी रोख मोबदलाच हवा, असे म्हणत मालमत्ता देण्यास विरोध केला. शिवाय काही धार्मिक स्थळे हटवन्यात अपयश आले. दरम्यानच्या काळातच त्यांची बदली झाली.

Aurangabad Road Work
Aurangabad:'या' खराब रस्त्यांचा पंचनामा करा;दोषींवर कारवाईची मागणी

शहर विकासासाठी या रस्त्यांचे रुंदीकरण गरजेचे 

● मुकुंदवाडी झेंडाचौक ते विश्रांतीनगर 

● झेंडाचौक ते बाळापूर  रेल्वे फाटक (येथे भुयारी मार्ग आवश्यक) पुढे राजनगर ते बीड बायपासरोड रुंदीकरण व नुतनीकरण 

● लक्ष्मणचावडी ते एमजीएम (एमजीएमने सार्वजनिक वाहतुकीचे गिळलेले रस्ते मोकळे करणे आवश्यक)

● दमडीमहल ते जालनारोड

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com