Aurangabad: दुर्घटना घडल्यानंतरच 'महावितरण'ला जाग येणार का?

Mahadiscom
MahadiscomTendernama
Published on

औरंगाबाद (Aurangabad) : नसरापूर येथील मोडकळीस आलेल्या सिडको एन वन टाऊन सेंटर भागातील स्माॅल स्केल इंडस्ट्रीजमध्ये विजेच्या धोकादायक केबलबाबत वारंवार पाठपुरावा करूनही चिकलठाणा मास्को काॅर्नर सबस्टेशन येथील महावितरण अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. एखादी मोठी दुर्घटना झाल्यावर महावितरणला जाग येणार का, असा सवाल लघुउद्योजक करत आहेत.

Mahadiscom
औरंगाबादेत आयआयटीच्या टीमने केली मेहमूद गेटची पाहणी

वैतागलेल्या नागरिकांनी महावितरणचे अधिक्षक अभियंता प्रकाश जमदाडे यांना थेट सवाल करताच त्यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुनिल शिंदे, हर्षदीप इलेक्ट्रीकल एजन्सीचे सबके या महावितरणच्या ठेकेदाराला तातडीने पाहणी करण्यासाठी पाठवले. शुक्रवारी वीजपुरवठा खंडीत करून केबल दुरुस्तीचे काम करण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले.

Mahadiscom
औरंगाबादेत विनाटेंडर कोट्यवधीच्या हरितपट्ट्यावर शाळेचा डल्ला?

येथील मारुती ऑटोमोटीव्हलगत महापालिकेच्या नाल्यात अकरा के. व्ही. हायटेंशन तारांना वीजपुरवठा करणारी केबल मल नि:सारणाच्या नाल्यात गेल्या कित्येक वर्षांपासून पडलेली आहे. याबाबत महानगरपालिका वार्ड अभियंता, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी व लघुउद्योजकांसह नागरिकांनी गेली कित्येक वर्षापासून येथील संबधित महावितरण अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे सतत पाठपुरावा केला आहेत. मात्र महावितरणचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.

Mahadiscom
औरंगाबादेत पहिल्याच किरकोळ पावसाने १५२ कोटींचे रस्ते पाण्यात

अद्यापही खांब नाल्यालगतच उभा असून, केबल देखील पाण्यातच आहे. विशेष म्हणजे केबलमध्ये पाणी जाऊन ती खराब झालेली आहे. सहा महिन्यांपूर्वी केबलचा स्फोट होऊन येथे मोठी आग लागली होती. याच खांबावर केबलसह तारांचा झोळ खाली येत असून, मोठी दुर्घटना अथवा जीवितहानी घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. महावितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Mahadiscom
Aurangabad: मनपा सेवांच्या तक्रारींसाठी फक्त एक फोन करा!

महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने महावितरण अधिकारी दुर्घटना अथवा जीवितहानी होण्याची वाट पाहत आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच याच भागात अनेक ठिकाणी वीजवाहक तारांचे आवरण खराब होऊन कुजले आहे. डीपी उघड्या आहेत. काही कचऱ्याच्या विळख्यात अडकल्या आहेत. याकडे महावितरणचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची दुर्लक्ष करत आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com