१५ कोटींचा रस्ता अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ४ वर्षांपासून रखडला

Aurangabad
AurangabadTendernama
Published on

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद शहरात स्मार्ट सिटीच्या (Smart City) नावाने महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय हे विकासगंगा आल्याचा गवगवा करत आहेत. परंतु, मुकुंदवडी - गारखेडा - शिवाजीनगर ते बीड बायपासला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याबाबत ते मौन पाळताना दिसते आहेत. अतिक्रमण काढता न आल्याने हा रस्ता चार वर्षांपासून रखडला आहे.

महानगरपालिकेच्या रस्ते बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भागवत फड, नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक अविनाश देशमुख आणि अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख रविंद्र निकम या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे जवळपास पंधरा कोटी रुपये खर्च करून तयार झालेला पन्नासफूटी रस्ता केवळ काही अतिक्रमणांमुळे रखडला आहे. संबंधित कंत्राटदार जे. पी. कन्सट्रक्शन कंपनीने महापालिकेला वारंवार सूचित करूनही गेल्या चार वर्षांत हे किरकोळ अतिक्रमण महानगरपालिकेला काढता न आल्याने रस्त्यावर खर्ची झालेला निधी अनावश्यक ठरला आहे.

Aurangabad
सातारा-देवळाईत कंत्राटदाराचा अंदाधुंद कारभार; कोट्यवधींचा चुराडा

'टेंडरनामा'ला मिळालेल्या माहितीनुसार सिडको हद्दीच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या जालना रस्त्याला पर्यायी वळण रस्ता म्हणून विठ्ठलनगर - सदाशिवनगर ते प्रकाशनगर पुढे श्रीरामनगर ते तानाजीनगर, शाहुनगर ते संघर्षनगर विमानतळ भिंत ते संतोषीमातानगर ते जीजाऊ हाउसिंग सोसायटी ते झेडा चौक ते विश्रांतीनगर ते सर्वे क्रमांक ४२ मोतीवाला नगर ते देवगिरी काॅलनी ते १२ वी स्किम मोरया मंगल कार्यालय ते शिवाजीनगर रेल्वे गेट विकास आराखड्यातील या कच्च्या रस्त्याचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला होता.

Aurangabad
समृद्धी महामार्गावर काँग्रेस नेत्याची 'ही' स्टंटबाजी कशासाठी?

सातारा - देवळाई, तसेच बीड बायपास व सिडकोवासियांची मागणी लक्षात घेता तत्कालीन महानगरपालिका आयुक्त डाॅ. विनायक निपुण यांनी शासन अनुदानातील शंभर कोटीच्या प्रकल्प यादीत या रस्त्याचे रुंदीकरण आणि व्हाईट टाॅपिंग रस्त्याच्या यादीत या रस्त्याचा समावेश केला.

या कामावर देखरेख करण्यासाठी पीएमसीसह महापालिकेचे तत्कालीन कार्यकारी अभियंता मोईनोद्दीन काझी, उप अभियंता भागवत फड आणि शाखा अभियंता शशिकांत पाटील या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती.

कंत्राटदार जे. पी. कन्सट्रक्शन कंपनीने वर्क ऑर्डर हातात पडताच सदाशिवनगर ते शाहूनगर विश्रांतीनगर झेंडा चौकापर्यंत एकाबाजूने रस्ता तयार केला. पुढे विश्रांतीनगर ते सिडको १२ वी स्कीम मोरया मंगल कार्यालय ते शिवाजीनगर पर्यंत रस्ता तयार केला.परिसरातील नागरिक या रस्त्याचा वापरही करत आहेत.

Aurangabad
पुणेकरांसाठी गुड न्यूज; 'या' मार्गावर 3668 कोटींतून भुयारी मेट्रो

अतिक्रमणाला अधिकाऱ्यांचे अभय

झेंडा चौकाच्या पुढे पश्चिमेला विश्रांतीनगर पर्यंत रस्त्याच्या मधोमध काही झोपड्या व पक्की घरे येत असून महानगरपालिकेने हे अतिक्रमण न काढल्याने रस्त्याचे काम खोळंबले आहे. आजवर या रस्त्यावर पंधरा कोटी रुपये खर्च झाले असून, हा रस्ता शिवाजीनगर पर्यंत नेण्याचा मार्ग बंद झाल्याने रस्त्याचे काम अपूर्ण असल्याचे दिसते आहे.

Aurangabad
औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जनतेच्या पैशाची उधळपट्टी

कंत्राटदाराची चार वर्षांत शंभर पत्रे

या संदर्भात कंत्राटदार मे. जे. पी. कन्सट्रक्शन कंपनीने चार वर्षांपासून महापालिकेकडे सतत तगादा लावूनही महानगरपालिकेतील संबंधित अधिकारी तिकडे फिरकत देखील नाहीत. परिणामी या झोपड्या आणि काही पक्क्या अतिक्रमणामुळे रस्त्याचे पुढील काम थांबले आहे.

नियमांला बगलात ठेऊन केले काम

या रस्त्याचे काम करताना आयआरसीच्या (Indian Road Congress) नियमांना फाटा देण्यात आला आहे. त्यामुळे हा नवा रस्ता होत्याचा नव्हता झाला आहे. रस्ता तयार करण्याआधी पाण्याचा निचरा करणाऱ्या भूमिगत गटारी, फूटपाथ, दूभाजक, पथदिवे आदी सुरक्षिततेच्या बाबींना फाटा देत ओबडधोबड रस्ता तयार केला आहे.

Aurangabad
'त्या' रस्त्याचे काम आजही अर्धवट; पैसे घेऊन कंत्राटदार पसार

रस्ता असून अडचण

महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकानुसार आम्ही रस्ता तयार केला असा दावा कंत्राटदाराने केला असला, तरी झोपड्या आणि इतर काही पक्क्या घरांचे अतिक्रमण हानगरपालिकेला हटविता न आल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. अतिक्रमणे काढून तातडीन रस्ता तयार करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com