BEST: उत्पन्न वाढीसाठी मोकळ्या जागांबाबत घेतला हा 'बेस्ट निर्णय'

BEST
BESTTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : आर्थिक संकटातील 'बेस्ट'ने (BEST) डोक्यावरील कर्जाचा भार कमी करण्यासाठी कुलाबा ते मुलूंड - दहिसर दरम्यानच्या जागा व्यावसायिक वापरासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्ट उपक्रमाने त्यासाठी टेंडर जाहीर केले आहे.

BEST
महाविकास आघाडीकडून मेगाभरती;अर्थ मंत्रालयाच्या निर्णयाने 1 लाख पदे

सुरक्षित व गारेगार प्रवासाची सुविधा देणाऱ्या बेस्ट उपक्रमाची गेल्या काही वर्षांत आर्थिक कोंडी झाली आहे. बेस्टवर ४ हजार कोटीहून अधिकचे कर्ज आहे. त्यामुळे महसूल वाढवण्यावर बेस्टने भर दिला आहे. यासाठी बेस्ट उपक्रमाने नवनवीन योजना अंमलात आणल्या आहेत. बेस्ट उपक्रमाच्या शहर व उपनगरात मिळून २७ बस आगार आहेत. तर वसाहती, कार्यालये आहेत. मात्र या जागांचा हवा तसा वापर होत नसल्याने कमर्शिअल म्हणजेच व्यवसाय करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने भाडेतत्त्वावर जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. कुलाबा ते मुलूंड - दहिसर दरम्यान बेस्ट उपक्रमाने २० ठिकाणच्या जागा भाडेतत्त्वावर देण्यासाठी टेंडर मागवली आहेत. यासाठी मासिक मोबदल्यावर या जागा कमर्शिअल व्यवसायासाठी दिल्या जाणार आहेत.

BEST
'जालना'त पाणीच पाणी; 'चिकलठाणा'त कोरड! एमआयडीसीकडून हा दुजाभाव का?

एकूण २० ठिकाणी कमर्शिअल वापरासाठी जागा भाड्यावर देण्यासाठी टेंडर मागवली आहेत. यात कांदिवली पश्चिम येथील कर्मचारी वसाहतीतील इमारत क्रमांक अ - मधील तळमजला, भोईवाडा येथील कर्मचारी वसाहतीतील इमारत क्रमांक बी - मधील तळमजला, ताडदेव येथील अरुण कमर्शिअल प्रिमायसेस इमारतीतील ५ व्या मजल्यावर, परळ येथील कर्मचारी वसाहतीतील इमारत क्रमांक ए - मधील तळमजल्यावर, मुलूंड पश्चिम येथील कर्मचारी वसाहत परिसरात असलेल्या वेगळ्या इमारतीतील पहिल्या मजल्यावर, मागाठाणे येथील वाहतूक कार्यालय इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर अशा एकूण २० ठिकाणच्या जागा भाड्याने दिल्या जाणार आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com