रत्नागिरीत जलपर्यटनाला चालना: 'त्या' क्रूझ टर्मिनलसाठी लवकरच टेंडर; 100 कोटींचे बजेट

Sanjay Bansode
Sanjay BansodeTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : कोकणातील भगवती क्रूझ टर्मिनल विकास प्रस्तावास सार्वजनिक बांधकाम विभागाची मान्यता मिळाली असून प्रस्ताव नियोजन विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची मान्यता मिळाल्यामुळे वित्त विभागाच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून टेंडर प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. यानिमित्ताने रत्नागिरी जिल्ह्याला जलपर्यटनाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

Sanjay Bansode
Eknath Shinde : जागतिक आर्थिक परिषदेत पाच लाख कोटींचे MOU

रत्नागिरी जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा क्रीडा, युवक कल्याण व बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात घेण्यात आला. यावेळी ही माहिती देण्यात आली. जलपर्यटनाच्या दृष्टीने मुंबई ते गोवा अलिशान क्रुझची सुरवात झाली आहे. पाण्यातील प्रवासाचा वेगळा अनुभव घेत पर्यटकांनी या प्रवासाला पसंती दिली आहे. मुंबई ते गोवा या प्रवासी जलवाहतुकीमध्ये भगवती बंदर येथील थांबा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी भगवती बंदर येथे क्रुझ टर्मिनल उभारण्यात येणार आहे. नियोजित भगवती बंदर क्रुझ टर्मिनल मोठ्या क्षमतेची प्रवासी जहाजे ये-जा करू शकतील, अशा पद्धतीने बांधण्यात येणार आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात या क्रुझ टर्मिनलसाठी 100 कोटींच्या अर्थसहाय्याची घोषणा केली आहे. यानिमित्ताने रत्नागिरी जिल्ह्याला जलपर्यटनाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

Sanjay Bansode
Mumbai : रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणासाठी लवकरच आणखी एक बिग बजेट टेंडर

दरम्यान, आर्थिक वर्ष संपण्यास दोन महिने शिल्लक असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील क्रीडा व बंदरे विभागाची विविध विकासकामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश यावेळी मंत्री संजय बनसोडे यांनी बैठकीत दिले. राजीवाडा खाडीतील गाळ काढण्याच्या कामाबाबत मत्स्य व्यवसाय विकास विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याचबरोबर बंदर जोड रस्ते, जेट्टी दुरुस्ती, कुरणवाडी जेट्टी ते मांडवा रस्ता तयार करणे आदी कामांच्या तांत्रिक मान्यतेचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आला आहे. मान्यता मिळताच टेंडर प्रक्रिया राबविण्यात येईल असे यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव पराग जैन यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यातील मिरजोळे एमआयडीसी येथे जिल्हा क्रीडा संकुलातील क्रीडा सुविधा निर्मितीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत असून रत्नागिरी जिल्ह्यात अद्ययावत व दर्जेदार क्रीडा संकुल उभारावे. येथील क्रीडापटुंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील अशारितीने काम करावे, अशा सूचना मंत्री बनसोडे यांनी क्रीडा विभागाला दिल्या. 

Sanjay Bansode
Mumbai : पनवेल एसटी डेपोच्या बांधकामाला 'हा' मुहूर्त; सूरत बसपोर्टच्या धर्तीवर...

संकुलातील उपहारगृह, प्रसाधनगृह, चेंजिग क्यूबिकल्स, कार्यालय इमारत, वसतिगृहाचे जोत्यापर्यंतचे काम पूर्ण झाले असून या कामावर ४ कोटी ६१ लाख ९० हजार रुपये निधी खर्च झाला आहे. जिल्हा क्रीडा संकुलातील खुले प्रेक्षागृह, ४०० मीटर धावनपथ, प्रेक्षकांसाठी गॅलरी, फुटबॉल आर्टिफिशियल टर्फ मैदान, ड्रेनेज बांधकाम, इनडोर हॉल, मुला मुलींचे वसतिगृह, क्रीडा संकुलातील अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत, मुख्य गेट, वॉचमन कॅबिन, इत्यादी उर्वरित कामांकरिता २० कोटी १६ लाख ३० हजार रुपयांचे सुधारित अंदाजपत्रक व आराखडे तयार करण्यात आले असून पूर्वीचे ७ कोटी ४० लाख असे दोन्ही मिळून २७ कोटी ५६ लाख रुपयांच्या कामास क्रीडा विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला निधी लवकरच वितरित करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

त्याचबरोबर एनसीसी भवन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या माध्यमातून बांधण्यात येत आहे. यासाठी ६३ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक असून याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामावर १५ कोटी खर्च झालेला आहे. उर्वरित कामे करण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही मंत्री बनसोडे यांनी सांगितले. बैठकीला बंदरे विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव पराग जैन, राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, तसेच आमदार दळवी, किरण सामंत उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com