Raigad : जिल्ह्यातील 57 कोटींची पर्यटन विकासाची कामे गतीने करा; मंत्री तटकरे

Aditi Tatkare
Aditi TatkareTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक पर्यटन विकासांतर्गत श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव, रोहा येथील विविध  विकास कामे  सुरू असून यासाठी ५७ कोटी ३० लाख रुपयांची तरतूद आहे. ही कामे विहित वेळेत प्राधान्याने पूर्ण करावेत, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. श्रीवर्धन मतदार संघातील प्रादेशिक पर्यटन विकास कामांबाबत मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भारत बास्टमोड, पर्यटन विभागाच्या सहसचिव उज्ज्वला दांडेकर, उपवनसंरक्षक (रोहा) अप्पासाहेब निकत, मुख्याधिकारी (म्हसळा) विठ्ठल राठोड आदी उपस्थित होते.

Aditi Tatkare
Good News : कोल्हापूर आयटी पार्कला गती; 30 हेक्टर जागा देण्याचे अजित पवारांचे निर्देश

मंत्री तटकरे म्हणाल्या की, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका, रायगड पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि पर्यटन संचालनालय यांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रादेशिक पर्यटनाच्या विकास कामांना गती द्यावी. दिवेआगार येथे कासव संवर्धन प्रकल्प उभारणे, पर्यटन मार्केट सुविधा तयार करणे, तळा महादेव तलाव परिसराची पर्यटनदृष्ट्या सुधारणा करणे, मोरबा येथील गाव तलावाचे सुशोभीकरण करणे, रोहा नगरपरिषद हद्दीतील मंदिर परिसराचे सुशोभीकरण करणे, श्रीवर्धन समुद्रकिनारी धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर सुशोभीकरण करणे, रोहा येथील ग्रामपंचायत पाटण - सई हद्दीतील कामे, जोगेश्वरी मंदिर परिसर सुशोभीकरण, मौजे नागोठाणे येथील सरखेल कान्होजी आंग्रे यांचे पुरातन निवासस्थान सुशोभीकरण, रोहा नगरपरिषद हद्दीतील हनुमान टेकडी परिसर सुशोभीकरण, तळघर येथील तलावाचे संवर्धन करणे अशी रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक पर्यटन विकासांतर्गत सन २०२१-२२ मधील श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव, रोहा येथील विविध  ४४ कोटी ७९ लाख रुपयांची कामे प्राधान्याने पूर्ण करावेत.

Aditi Tatkare
Mumbai : उपनगरात झोपड्पट्टीवासीयांसाठी नव्याने 12000 स्वच्छतागृहे; 628 कोटींची...

श्रीवर्धन शहरातील पर्यटक निवासी इमारतींचे नूतनीकरण, तलाव कुंडाचे नूतनीकरण,म्हसळा येथील जानसई नदी सुशोभीकरण कामे, श्रीवर्धन येथील मंदिर विकासाची कामे, रोहा नगरपरिषद हद्दीतील शिवसृष्टी परिसर सुशोभीकरण, रोहा येथे शिवसृष्टी शिल्प तयार करणे, तळा येथील कुडा लेणी येथे पर्यटनाच्या मूलभूत सुविधा निर्माण करणे, अशी 2022 -23 मधील बारा कामे १२ कोटी ५१ लाखांची असून  सर्व यंत्रणांनी हे कामे गतीने पूर्ण करावेत, असेही निर्देश मंत्री तटकरे यांनी दिले.

Aditi Tatkare
EXCLUSIVE : मुख्य सचिवांच्याच नियमांना 'वाकुल्या'; तब्बल पावणेतीन वर्षे PWDत अनधिकृत कारभार!

श्रीमंत पेशवे यांच्या श्रीवर्धन येथील स्मारकाचा आराखडा तयार करा-
श्रीवर्धन (जि. रायगड) येथील श्रीमंत पेशवे यांच्या नियोजित स्मारकासाठी सर्व परवानग्या जलदगतीने घेऊन आराखडा उत्कृष्टरितीने तयार करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. मंत्रालयातील दालनात यासंदर्भात आयोजित बैठकीत मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन, मुख्याधिकारी (श्रीवर्धन) विराज लबडे, नारायण देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त प्रसाद पेंडसे, प्रतिनिधी अविनाश गोगटे, श्रेयस जोशी, लक्ष्मी नारायण देवस्थानचे प्रतिनिधी गजानन करमरकर उपस्थित होते.

यावेळी स्मारकाच्या जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व यंत्रणांनी तातडीने मार्ग काढावा, अशी सूचना मंत्री तटकरे यांनी केली. देवस्थान समितीने स्मारकासाठी जागा देण्याबाबत सकारात्मक चर्चा केली, तरीही याबाबतीत काही अडचणी असल्यास धर्मादाय आयुक्त यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री तटकरे यांनी केल्या.                  तटकरे म्हणाल्या की, नगरविकास, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागांनी स्थानिक ठिकाणी आवश्यक त्या परवानग्या विहीत वेळेत घेऊन या कामाला गती द्यावी. या ठिकाणी उभारण्यात येणारे स्मारक आपल्या इतिहासाचे साक्षीदार ठरेल असे स्मारक उभारण्यासाठी सर्वांच्या सूचना लक्षात घेऊन काम करावे. रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटक, इतिहासप्रेमी  आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारे हे स्मारक होईल, अशी अपेक्षाही यावेळी तटकरे यांनी व्यक्त केली. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com