७४१ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण अखेर पूर्ण; खर्च...

Kokan railway
Kokan railwayTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : कोकण रेल्वेचे (Kokan Railway) विद्युतीकरण अखेर पूर्ण झाले आहे. कोकण रेल्वेच्या 741 किलोमीटरच्या मार्गाच्या विद्युतीकरणाची कामे दोन टप्प्यांत सुरू झाली होती. आणि या संपूर्ण प्रकल्पावर 1287 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना वेगवान आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. या मार्गावर टप्प्याटप्प्याने मेल-एक्स्प्रेस विजेवर धावण्यास सुरुवात होणार असल्याचे कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे.

Kokan railway
मुंबई-नागपूर सुसाट; समृद्धीमुळे अंतर अवघे एवढ्या तासांवर

कोकण रेल्वेच्या विद्युतीकरण प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते नोव्हेंबर 2015मध्ये झाले होते. 2016मध्ये प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली होती. कोकण रेल्वेच्या 741 कि.मी.च्या मार्गाच्या विद्युतीकरणाची कामे दोन टप्प्यांत सुरू झाली होती. या संपूर्ण प्रकल्पावर 1287 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मार्च 2020पासून विविध सहा टप्प्यांमध्ये या मार्गाचे रेल्वे सुरक्षा आयुक्तांतर्फे 'इन्स्पेक्शन' करण्यात आले. 24 मार्च रोजी रत्नागिरी ते थिवीम मार्गावर शेवटचे 'इन्स्पेक्शन' पूर्ण होऊन संपूर्ण मार्गाच्या विद्युतीकरणाला अखेर ग्रीन सिग्नल मिळाला आहे. कोकणातील दुर्गम मार्ग त्यातच कोरोना काळ आणि जोरदार पर्जन्यवृष्टी असूनही विद्युतीकरणाचे काम थांबले नाही. विजेच्या इंजिनावर मेल-एक्सप्रेस गाड्या धावल्याने प्रदूषण तर कमी होईलच, शिवाय गाड्यांचा वेग वाढून वार्षिक 150 कोटी रुपयांची डिझेल बचत होणार आहे.

Kokan railway
मुंबई-गोवा सुसाट...; आता थेट सिंधुदुर्गापर्यंत पर्यायी मार्ग

कोकण रेल्वेचा मार्ग रोहा ते ठोकूरपर्यंत असून विद्युतीकरण आणि दुपदरीकरणाचे काम एकत्र सुरू झाले होते. रोहा ते वीर असे दुपदरीकरण पूर्ण झाले असून उर्वरित ठिकाणी दहा क्रॉसिंग स्थानके बांधण्यात आली आहेत. या 741 कि.मी.च्या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्याने कोकण रेल्वेसारख्या स्वायत्त महामंडळाने स्वातंत्र्यानंतर पूर्ण केलेला हा पहिला मोठा प्रकल्प ठरला आहे.

Kokan railway
यामुळे मुंबई पश्‍चिम उपनगर ते नवी मुंबई प्रवास आता सुसाट

नैसर्गिकदृष्ट्या दुर्गम मार्ग -
कोकण मार्गावर 1880 पूल आणि 91 बोगदे आहेत. रत्नागिरीच्या करबुडवे येथे सर्वात लांब 6.5 कि.मी.चा बोगदा आहे. तर पनवेल नदीवर सर्वात उंच 64 मीटरचा पूल आहे.

दहा नवीन स्थानकांची भेट -
कोकण रेल्वेवर आठ नवीन क्रॉसिंग स्टेशन बांधण्यात आली आहेत. त्यात सापेवामणे, कलवणी, कडवई, वेरवली, खारेपाटण, आचिर्णे ही कोकण रेल्वेवर तर मिर्झान व इन्नांजे ही दोन रेल्वे स्थानके कर्नाटकातील आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com