Ashok Jawale
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ जून २०२४ रोजी नालंदा विद्यापीठाच्या नव्या संकुलाचे उद्घाटन केले.
नालंदा विद्यापीठाला १६०० वर्षांचा इतिहास आहे. बिहारमधील पाटणा जवळ असलेल्या राजगीर शहराजवळ हे विद्यापीठ उभारण्यात आले आहे.
नालंदा विद्यापीठाची नव्याने स्थापना करण्याची संकल्पना माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी मांडली होती.
२०१६ मध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते नालंदा विद्यापीठाच्या संकुलाचे भूमिपूजन करण्यात आले.
हे संकुल शंभर एकरावर पसरले असून, सर्व इमारती पर्यावरणपूरक आहेत.
१९०० विद्यार्थी बसू शकतील अशा एकूण ४० वर्ग खोल्या तयार करण्यात आल्या आहेत.
येथील ग्रंथालयात सप्टेंबर पर्यंत तीन लाख पुस्तके आणि तीन हजार सदस्यांना सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
इतिहासातील समृद्ध वारसा आणि अधुनिकता यांचा संगम येथे साधण्यात आला आहे.