टेंडरनामा ब्युरो
कोटी-कोटींच्या घोषणा करणाऱ्या गडकरी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही १०० कोटींची घोषणा करून बहार आणली.
नितीन गडकरी यांच्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या सांगता समारंभाला फडणवीस यांनी जोरदार टोलेबाजी केली.
गडकरींनी नागपुरातील क्रीडा विश्वाला बळकटी देण्यासाठी मैदानाच्या विकासाची संकल्पना मांडली होती.
त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मैदनांच्या विकासासाठी १०० कोटी देण्याची घोषणा केली.
मागील १५ दिवसांपासून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा २२ जानेवारीला ग्रेट खली यांच्या उपस्थितीत यशवंत स्टेडियवर समारोप झाला.
नागपूर शहरात निर्माण होणाऱ्या क्रीडांगणांचे संकल्पचित्र व डिझाईन नितीन गडकरी यांच्या संकल्पनेनुसारच तयार होईल, असे फडणवीस म्हणाले.
धंतोली येथील यशवंत स्टेडियमचा पुनर्विकास प्रस्तावित असून, त्यासाठी आवश्यक सर्व परवानगी, युजरचेंज राज्य सरकारकडून लवकरच पूर्ण येतील.
हॉकीचे ॲस्ट्रोटर्फ मैदान तयार करून त्यातून नागपूर शहरातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू पुढे येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Next: देशातील सर्वांत मोठा सी-लिंक पाहिला का?