Tenders Ptoday
टेंडरिंग

टेंडर रिंग करणे म्हणजे काय?

एखाद्या प्रकल्पासाठी पूर्वगणनपत्रक (इस्टिमेट) मान्य झाल्यावर संबंधित कामाकरिता निविदा मागविण्यात येते. सदर निविदेतील संचामध्ये (नस्ती) पूर्वगणनपत्रक प्रसिद्ध करण्यात येते.

टेंडरनामा ब्युरो

एखाद्या प्रकल्पासाठी पूर्वगणनपत्रक (इस्टिमेट) मान्य झाल्यावर संबंधित कामाकरिता निविदा मागविण्यात येते. सदर निविदेतील संचामध्ये (नस्ती) पूर्वगणनपत्रक प्रसिद्ध करण्यात येते. इच्छुक निविदाधारकाने निविदा संचामधील सर्व अटी व शर्ती समजून घेऊन पूर्वगणनपत्रकाचा विचार करून संबंधित कामासाठी लागणारा खर्च निविदेमध्ये दाखल करावयाचा असतो. निविदेमध्ये प्राप्त झालेल्या सर्वात कमी दराची निविदेची तुलना निविदेपुर्वी तयार करण्यात आलेल्या पूर्वगणनपत्रकासोबत करण्यात येते. ज्यामुळे प्रकल्पाची किमतीचा अंदाज घेण्यात येतो. तेव्हा निविदा कमी दराची असल्यास सदर निविदेला (Below tender) असे म्हणतात. साधारपणे सध्याच्या स्थितीत काही प्रकल्पांसाठी महणजे पूर्वगणकपत्रकाच्या तुलनेत १० ते १२ ट्कके कमी दाराने निविदा भरण्यात येतात आणि अशा ठेकेदारांना कामे देण्यात येतात. त्यापलीकडे पूर्वगणनपत्रक पेक्षा जास्त दर असलेल्या निविदेला Above tender असे जाहीर केले प्राप्त झालेली निविदा रक्कम पूर्वगणनपत्रक एवढीच असल्यास सदर प्राप्त निविदेला 'At par' निविदांना असे गृहीत धरण्यात येतो. यामुळे प्राप्त झालेल्या निविदेची शिफारस करणे अथवा कसे ? या बाबत निर्णय घेण्यात मदत होते.

निविदा रिंग करणे

प्रकल्पांसाठी निविदा मागविल्यानंतर स्पर्धात्मक दर प्राप्त होण्याच्या दृष्टीने किमान २ ते ३ निविदा प्राप्त होणे अभिप्रेत असतात. मात्र, काही ठेकेदार कंपन्या एकत्र येऊन संगनमताने निविदा दाखल करतात, अशा प्रकाराला निविदा रिंग करणे असे मानले जाते. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाच्या निविदेत स्पर्धा होत नसल्याचे दिसून येते. त्याचा परिणाम निविदेत पारदर्शकताही नसते. स्पर्धा न होण्याची शक्यतेमुळे रिंग झालेल्या निविदा रद्द करण्यात येतात. त्यातून प्रकल्पाच्या अपेक्षित खर्चापेक्षा अधिक दराची निविदा प्राप्त होण्याचीही भीती असते.