Vande Bharat Train Tendernama
टेंडर न्यूज

मोठी बातमी! मुंबई-पुणे प्रवास अवघ्या 2.5 तासांत; वाचा कसे ते...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : महाराष्ट्राला वंदे भारत रेल्वे गाडी (Vande Bharat Train) मिळणार असून, ती मुंबई ते पुणे या रेल्वे मार्गावर धावणार आहे. याचा फायदा मुंबई आणि पुणे असा प्रवास करणाऱ्यांना होणार असून, हा प्रवास आता फक्त अडीच तासांत होणार आहे. रेल्वेने २०० 'वंदे भारत' स्लीपर रेल्वे गाड्यांसाठी टेंडर प्रसिद्ध केले असून, हे टेंडर भरण्याची अंतिम तारीख २६ जुलै २०२२ आहे. 'वंदे भारत' एक्सप्रेस रेल्वे गाडीचा वेग ताशी १६० किलोमीटर आहे.

१५ ऑगस्टपर्यंत दोन गाड्या महाराष्ट्राला मिळू शकतात. सध्या प्रवासासाठी उपलब्ध असलेल्या ट्रेनमधून प्रवास केला तर आपल्याला मुंबई-पुणे प्रवासासाठी तीन ते साडेतीन तास लागतात. पण वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यावर हा प्रवास जवळपास अडीच तासावर येणार आहे.

भारतीय रेल्वे लवकरच २०० 'वंदे भारत' स्लीपर ट्रेन चालवण्याची तयारी करत आहे. त्यासाठी टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या टेंडरमध्ये ट्रेनचे डिझाइन, मॅन्युफॅक्चरिंग आणि मेंटेन्सचे नियोजनही आहे. तसेच, लवकरच ट्रेनचे अपग्रेडेशन केले जाईल, असे सांगितले. सध्या या ट्रेनच्या अपग्रेडेशनचे काम महाराष्ट्रातील लातूर येथील मराठवाडा रेल कोच फॅक्टरीत केले जात असून यानंतर हे काम चेन्नईतही केले जात आहे.

वंदे भारत ही ट्रेन आता मध्यम आणि लांब पल्ल्यांसाठी चालवली जाईल, असे रेल्वेचे नियोजन आहे. ट्रेनमध्ये अप स्लीपर कोचदेखील असतील, जेणेकरून लोकांना लांबचा प्रवास करताना कोणतीही अडचण येणार नाही. रेल्वेने या संदर्भात एक टेंडर जारी केले असून ज्याची अंतिम तारीख २६ जुलै २०२२ आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ताशी १६० किलोमीटर वेगाने धावेल. या ट्रेनमध्ये फर्स्ट, सेकंड एसी आणि थर्ड एसी सुविधा उपलब्ध असतील. या ट्रेनमध्ये एकूण १६ डबे बसवण्यात येणार आहेत.