Devendra Fadnavis Tendernama
टेंडर न्यूज

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या ड्रिम प्रोजेक्टला भ्रष्टाचाराचे सुरूंग?; अटल भूजल योजनेचे तीन तेरा

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूर जिल्ह्यात गेल्या वर्षापासून ड्राय झोन असलेल्या काटोल तालुक्यातील कोंढाळी, मासोद राजस्व मंडळातील अनेक गावांचा अटल भूजल योजनेत सविष्ट असून या दोन्ही राजस्व मंडळा सह तालुक्यातील (122) गावातील अटल भूजल योजना फक्त गावाच्या वेशीवरील बोर्डावरच दिसून येत आहे. खरतर या योजनेंतर्गत गाळ काढणे, रिचार्ज शाप्ट तसेच बंधाऱ्याची देखभाल दुरुस्ती करणे, पर्जन्यमापक यंत्र बसविणे, पाण्याची पातळी मोजण्यासाठी पिजोमिटर बसविणे, नाला खोलीकरण करणे, बंधारे दुरुस्ती करणे यासह विवीध प्रकारची जल संधारणाची कामे अभिसरणातून व लोकांच्या मदतीने केली जातात.

अशी अनेक कामे ड्राय झोन असलेल्या  कोंढाळी, मासोद भागात करणे गरजेचे आहे. मात्र याकडे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा लक्ष देत नसून जी कामे केली जात आहेत ते निकृष्ट दर्जाची असल्याने या शेतकरी हिताच्या अटल भूजल योजनेचे तीन तेरा वाजल्याची तक्रार मासोद च्या सरपंच रंजू प्रकाश बारंगे व उपसरपंच रूपराव गोंडाणे यांनी यांनी संबधित अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात केली आहे. या भागातील जनप्रतिनिधी सरपंच, उपसरपंच यांनी लेखी तक्रार करूनही अधिकारी या तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्याने ठेकेदाराकडून करण्यात आलेले नाला सफाई च्या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असून या नाला खोलीकरणामुळे नाल्यात पाण्याची साठवणूक होण्यापेक्षा जुने बंधारेच वाहून जातील असे काम खोलीकरण दरम्यान नियमबाह्य काम करण्यात आल्याची माहिती सरपंच रंजू प्रकाश बारंगे यांनी  दिली आहे.

डार्क झोन मधील मासोद कामठी या भागातील नाला खोलीकरणातील  गैरप्रकारामुळे काटोल तालुक्यासह मासोद-कामठी चा भौगोलिक भागाला डार्क झोन मधेच ठेवण्याचे कट कारस्थान राज्य सरकार च्या अटल भू-जल योजनेच्या अधिकारी व संबंधित ठेकेदारांचा उद्देश असल्याचे मासोद चे सरपंच उपसरपंच यांनी‌ सांगितले आहे. अटल भूजल योजने अंतर्गत निकृष्ट  व नियमबाह्य काम करवून घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर  जिल्हाधिकारी करतील काय ?असा सवाल ही करण्यात आला आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रिम प्रोजेक्ट ला  त्यांच्याच जिल्ह्यातील अटल भू जल योजने चे अधिकारी  भ्रष्टाचाराचे सुरूंग लावत असतील तर या भ्रष्ट अधिकारी व कंत्राटदाराला अभय तरी कुणाचे? असाही सवाल सरपंच रंजू प्रकाश बारंगे व उपसरपंच कोंडाणे यांनी केला आहे‌‌. या प्रकरणी या भागातील उपविभागीय अधिकारी सोनवाने  यांचे सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता पण संपर्क झाला नाही.