Chinab River Tendernama
टेंडर न्यूज

'त्या' अद्भुत ढगात असलेल्या पुलाचे काम पूर्ण; डिसेंबरपर्यंत खुला

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : सिव्हिल इंजिनिअरिंगचा अद्भुत नमुना असलेल्या सर्वाधिक उंच चिनाब पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. आता केवळ रेल्वे रुळ टाकण्याचे काम उरले आहे. येत्या डिसेंबरच्या अखेरीस या पुलाचे उद्घाटन होऊन हा पूल सर्वसामान्यांना खुला होईल अशी शक्यता आहे. हा पूल श्रीनगरला उर्वरित भारताशी जोडणार आहे. या पुलासाठी सुमारे २८ हजार कोटींचा खर्च झाला आहे.

हा पूल 1.315 किलोमीटर लांब असून त्याची उंची 359 मीटर आहे. चिनाब ब्रिज आयफेल टॉवरपेक्षा उंच आहे. भारतात बांधला जात असलेला हा पूल जगातील सर्वात उंच आर्क पूल आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंच्या सलाल-ए आणि दुग्गा रेल्वे स्थानकांना रियासी जिल्ह्यातील चिनाब नदीशी जोडेल. कटरा-बनिहाल रेल्वे सेक्शनवर उत्तर रेल्वेकडून चिनाब पूल बांधला जात आहे. या पुलासाठी सुमारे २८ हजार कोटींचा खर्च झाला आहे. चिनाब पूल उधमपूर-कटरा-कांजीगुंडला जम्मूशी जोडेल. चिनाब पूल नदी पातळीपासून 359 मीटर उंच आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल होण्याचा मान या पूलाला मिळणार आहे. हा पूल फ्रान्समधील आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच आहे.

या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाच्या कमानीचे काम एप्रिल 2021 मध्येच पूर्ण झाले. या कमानीचे एकूण वजन 10619 मेट्रिक टन असून त्याचे भाग भारतीय रेल्वेने प्रथमच केबल क्रेनद्वारे उभारले आहेत. 14 ऑगस्ट 2022 रोजी, रियासी जिल्ह्यातील कौरी भागात चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाच्या वरच्या डेकचे काम पूर्ण झाले. रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, पुलाच्या स्ट्रक्चरल डिटेलिंगसाठी 'टेकला' सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये वापरलेले स्ट्रक्चरल स्टील मायनस 10 डिग्री सेल्सिअस ते 40 डिग्री सेल्सिअस तापमानाला तोंड देऊ शकते.

चिनाब ब्रिज हा पूल कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) आणि उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक (USBRL) प्रकल्पाचा भाग आहे. रेल्वेने या पुलाचे नयनरम्य असे फोटो ट्विटरवर प्रसिद्ध केले आहेत.