Nashik court 
टेंडर न्यूज

सात मजली कोर्टाच्या इमारतीसाठी १७१ कोटींचे टेंडर

ग्रीन बिल्डींग ३ लाख ६६ हजार ८४८ चौरस फूटावर साकारणार

टेंडरनामा ब्युरो

नाशिक : नाशिक जिल्हा न्यायालयाच्या आवारात नव्याने सात मजली भव्य दिव्य पर्यावरण पूरक इमारत (ग्रीन बिल्डींग) होणार आहे. अशा प्रकारची राज्यातील पहिली इमारत असणार आहे.

नाशिकच्या वैभवात भर टाकणाऱ्या इमारतीसाठी १७१ कोटीच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून, त्याचे टेंडर प्रसिध्द झाले आहे. अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जिल्हा न्यायालयाच्या प्रस्तावित सात मजली ग्रीन बिल्डींग ३ लाख ६६ हजार ८४८ चौरस फूटावर साकारणार आहे.

इमारतीसाठी १७१ कोटी रुपयांचे टेंडर प्रसिध्द झाले आहे. सध्याची नाशिकची न्यायालयाची इमारत ब्रिटीशकालीन हेरिटेज इमारतीच्या पाठीमागील बाजूला ही नवीन इमारत होणार आहे. त्यामुळे सहाजिकच न्यायालयाच्या भव्यदिव्यतेचे सौदर्य आणखी खुलणार आहे. मागच्या बाजूला अद्यावत पर्यावरणपूरक इमारत आणि पुढच्या बाजूला हेरिटेज वास्तू म्हणजे बांधकाम क्षेत्राला एक दिशा देणार आहे. तळमजल्यावर वरिष्ठ न्यायालय, बार रुम, हिरकणी रुम, ग्रंथालय असेल. पहिल्या मजल्यावर वरिष्ठ न्यायालयाचे ३ चेंबर, लोक अदालत, रेकॉर्ड रुम, वेटीग कोर्ट हॉल, दुसऱ्या मजल्यावर वरिष्ठ न्यायालय ८ कक्ष, ग्रंथालय, व्हिडीओ कॉन्फरन्स, सरकारी अभियोता कक्ष, स्ट्रॉग म, तिसरा मजल्यावर वरिष्ठ न्यायालयाचे ७ कक्ष, पोस्को न्यायालय दोन कक्ष, चौथ्या मजल्यावर जिल्हा सत्र न्ययालय कक्ष, व्हिडीओ कॉन्फरन्स हॉल, रेकॉर्ड रुम, पेन्शन व पोस्को कोर्ट हॉल, पाचव्या मजल्यावर जिल्हा न्यायालय ७ कक्ष, व्हिडीओ कॉन्फरन्स, ग्रंथालय, सहाव्या मजल्यावर पीडीजे कोर्ट हॉल, दोन चेंबर, स्ट्रॉंग रुम, कोर्ट मॅनेजर हॉल, वित्त विभाग, बैठक रुम, सातव्या मजल्यावर स्टेनो, बैठक रुम, कॉन्फरन्स हॉल, रिक्रिएशन हॉल अशी रचना असणार आहे.

इमारतीची वैशिष्ट्ये

  • इमारत बांधकाम - ९० कोटी ३० लाख

  • रेन रुफ वॉटर हार्वेस्टींग - २५ लाख

  • सोलार रुफ टॉप - २५ लाख

  • अपंगासाठी सरकता जिना - १० लाख

  • सीसीटीव्ही - १० लाख

  • गॅस पाईपलाईन,बायो डायजेस्टर - २ लाख

अंर्तगत रचना

  • तळमजला अधिक सात मजले इमारत श्रेत्रफळ - ३४०९३.७० चौ.मी.

  • मुख्य जिल्हा सत्र न्यायधीश - १

  • वरिष्ठ विभाग न्यायालय - २१

  • जिल्हा न्यायालये - १८

  • लोक अदालत - १

  • पोस्को न्यायालय - ३

  • चाईल्ड फ्रेंडली कोर्ट - १