mumbai Tendernama
टेंडर न्यूज

Mumbai : शिंदे सरकारचा मोठा निर्णय! मुंबईकरांना काय दिली गुड न्यूज?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता निर्माण झालेली असताना राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मोठे निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. सोमवारी सकाळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या निर्णयांना सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे.

मुंबई शहरातील नागरिकांना दिलासा देणाऱ्या काही निर्णयांचा यांत समावेश आहे. मुंबई शहराच्या प्रवेशद्वारांवरील पाच टोलनाक्यांवर हलक्या वजनाच्या वाहनांना टोलमाफी देण्याची घोषणा शिंदे सरकारने केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी आज (ता. १४) रात्रीपासूनच केली जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत इतरही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

✅ मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज (ता. १४) रात्रौ १२ वाजेपासून अंमलबजावणी.

✅ आगरी समाजासाठी महामंडळ

✅ समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम

✅ दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता

✅ आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता

✅ वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता

✅ राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित

✅ पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी

✅ खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य

✅ राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार

✅ पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता

✅ किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ

✅ अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ

✅ मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे

✅ खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना

✅ मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा

✅ अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळ अभ्यासगट

✅ ‘उमेद’साठी अभ्यासगट

✅ कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव