Aurangabad Tendernama
टेंडर न्यूज

औरंगाबादेतील 'त्या' दुभाजकाच्या कामात अखेर कंत्राटदराकडून सुधारणा

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद : शहरातील सिडको एन-दोन एसटी काॅलनी प्रभागातील हाॅटेल दिपाली ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन मार्गाचे व्हाइट टाॅपिंग, फुटपाथ आणि पावसाळी भूमिगत गटारीसह दुभाजकाचे काम शासनाच्या अनुदानांतर्गत होत आहे. दरम्यान होत असलेल्या दुभाजकाचे बांधकामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याबाबत सडेतोड वृत्त टेडरनामा' ने बुधवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. या प्रकरणात प्रशासकांनी लक्ष घालावे, अशी ठोस भूमिका 'टेंडरनामा'ने घेतल्यानंतर तशी थेट प्रशासकांना विचारणा केल्यानंतर त्यांच्या आदेशाने थेट शहर अभियंत्यांनी जबाबदार अधिकार्यांसह भेटी देऊन कामाची पाहणी केली होती. यावेळी शहर अभियंत्यानी दिलेल्या सुचनांचे कंत्राटदार पूरेपुर पालन करत असल्याचे टेंडरनामा च्या पाहणीत दिसून आले. यामुळे दर्जेदार दुभाजक बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

नेमके काय आहे प्रकरण

औरंगाबाद महापालिकेच्या माध्यमातून सरकारी अनुदानांतर्गत सिडको एन - २ व सिडको एन - ३ व एन - ४ या दोन वार्डाच्या मध्यभागातून जाणारा अत्यंत वर्दळीचा असलेल्या या नव्याकोर्या रस्त्याच्या मध्यभागी हाॅटेल दिपाली ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन या एकुन १६०० मीटर लांबीचा व ३ फुट उंच आणि १२ इंच लांबीचा दुभाजक तयार करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी महापालिका तब्बल कोट्यावधी रूपये खर्च करत आहे. सदर काम जीएनआय कंन्सट्रक्शन कंपनीने जानव्ही कंन्सट्रक्शनला दिले आहे.

असा आहे कंत्राटदाराचा दावा

गेल्या चार दिवसापूर्वीच कंत्राटदाराकडुन आरसीसी दुभाजकाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार माजी नगरसेवक दामोदर शिंदे यांनी टेंडरनामाकडे केली होती. मात्र मी केलेले काम टेंडरच्या मानकाप्रमाणेच आहे. बांधकाम केल्यानंतर एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुभाजकाला टेकू दिलेल्या बल्ल्या पडल्याने तो बेंड झाला होता. दूभाजकात साडेसात फुटाच्या जाळ्या तयार केल्या असुन त्यात साडेबारा एमएमचे आणि आठ एमएमचे लोखंडी बार टाकलेले आहेत. शिवाय काॅक्रीट देखील एम - ३० ग्रेडचे असल्याचा दावा कंत्राटदाराने केला होता. याशिवाय बांधकामावर वेळोवेळी क्युरिंग करत असल्याचेही ते म्हणाले होते.

प्रशासकांकडुन वृत्ताची दखल

त्यावर 'टेंडरनामा'ने बुधवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. महापालिकेचे प्रशासक आस्तीककुमार पाण्डेय यांनी वृत्ताची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले होते. प्रसंगी शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता बी.डी.फड, उप अभियंता राजीव संधा, शाखा अभियंता एस.एस.पाटील यांनी बांधकामाच्या ठिकाणी जावून पाहणी केली होती. यावेळी पीएमसी (प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम ) यश इनोव्हेटीव्ह सोल्युशनचे संचालक समीर जोशी , झेड. ए. फारूकी, बीपीन हटकर , तसेच जीएनआय कन्सट्रक्शनचे अभियंता किरण सोनवने व सिंग तसेच जान्व्ही क॔न्सट्रक्शन कंपनीचे सब क॔त्राटदार दत्ता पोखरकर उपस्थित होते.

शहर अभियंत्यांची तंबी, कंत्राटदाराकडुन कामात सुधारणा

यावेळी शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी जबाबदार सर्व अधिकार्यांस. कंत्राटदाराची चांगलीच कान उघाडणी करत यापुढे दर्जेदार काम करा अन्यथा कामाचे देयक मिळणार नाही अशी तंबी दिली होती.

टेंडरनामाची पूर्नपाहणी

त्यावर कंत्राटदार अधिकाऱ्यांना दिलेल्या सुचनांची काय पुर्तता केली याबाबत प्रतिनिधीने शनिवारी रात्री आठच्या सुमारास या भागातील नागरिकांसह पाहणी केली असता कामात बराच फरक दिसुन आला.शिवाय येथील नागरिकांनीही कामाबाबत समाधान व्यक्त केले.

असा झाला कामात बदल

● वापरलेल्या बांधकाम साहित्याचा दर्जा तपासल्याची मस्टर रजिस्टरवर नोंद दिसुन आली. त्यात वाहनक्रमांक , पावती आणि काॅक्रीट क्युब तपासणीचा अहवाल चिपकवलेला दिसला.

● दुभाजकातील कामादरम्यान लोखंडी जाळ्यात काॅक्रीट भरल्यानंतर व्हायब्रेटर मशिनने दबाई करून काॅक्रीट एकजीव केले जात होते. विशेष म्हणजे याकामासाठी कंत्राटदाराने साडेबावीस हजार रूपये खर्चुन नवे व्हायब्रेटर मशीन आणले. डीझेल जनरेटरच्या सहाय्याने बांधकामाची दबाई केली जात आहे.

● लोखंडी जाळ्यात काॅक्रीट ओतल्यानंतर चांगल्या पध्दतीने दबाई करून नंतर त्याची क्युरिंगकरून नव्या बांधकामाला आधार देणार्या लोखंडी प्लेटांना ऑईल आणि ग्रीसींग करूनच त्या लावल्या जात असल्याचे दिसले.

● शहर अभियंत्यांच्या सुचनेनुसार कंत्राटदार वाहतूकीची वर्दळ कमी असताना अर्थात रात्रीच्या वेळी काम करत असल्याने वाहनांच्या व्हायब्रेशनचा देखील धोका टळला आहे.