Eknath Shinde Tendernama
टेंडर न्यूज

प्रकल्पांचं 'ठाणं';शिंदेंच्या जिल्ह्यात २१ प्रकल्पास १७००० कोटींचे

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ठाणे जिल्ह्यात एमआरडीएच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी तब्बल १७ हजार कोटींचे २१ प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. विशेषतः वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी रस्त्यांचे रुंदीकरण करुन काँक्रीटीकरण करणे, खाडी पूल, नवीन बोगदे, उड्डाणपूल बांधणे आदी विविध कामांचा यात समावेश आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमआरडीएच्या माध्यमातून ठाण्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांवर भर दिला आहे. ठाण्यासह परिसरातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी एमएमआरडीएकडून विविध प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएला याबाबतचे निर्देश दिले आहेत. यामुळे ठाणे आणि परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी मदत होणार आहे. कोपरी ते पोटणी ६ पदरी १ किमी लांबीचा खाडीपूल - 333 कोटी, गायमुख ते भिवंडीदरम्यान तीन खाडीपूल - 1698 कोटी, ठाणे कोस्टल रोड भाग 2 - गायमुख ते फाऊंटन हॉटेल 5.36 किमी लांबीचा रस्ता आणि खारेगाव ते कोपरी 7.34 किमी लांबीचा रस्ता - 2107 कोटी, मुरबे ते सातपाटी (पालघर) खाडीवर नवीन ३ किमी पुलाची बांधणी - 365 कोटी, शिळ फाटा ते माणकोली - 9 किमीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण, उल्हास नदीवर 1.6 किमीचा खाडीपूल, देसाई खाडीवर 70 मीटर लांबीचा पूल, दिवा पूर्व आणि पश्चिम जोडणीसाठी 610 मीटर लांबीचा उड्डाणपूल - 1440 कोटी.

कल्याण ते माणकोली (बापगांव) गांधारी खाडीवरील सध्यस्थितीतील दोन पदरी पुलाचे चौपदरीकरण, गांधारी पूल ते राष्ट्रीय महामार्ग दुपदरी रस्त्याचे चौपदरीकरण करून काँक्रीटीकरण करणे - 400 कोटी, ठाण्यातील दहिसर ते महापे नवीन बोगदा, नवी मुंबई, कल्याण, अंबरनाथ, कुळगाव, बदलापूर आणि पडघा यांना जोडणारा महानगरातील प्रादेशिक मार्ग प्रस्तावित - 1558 कोटी. दहिसर ते मुरबाड ४० किमीचा रस्ता - 3372 कोटी, टिटवाळा ते बदलापूर रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण - 959 कोटी, वसई ते पालघर नारिंगी खाडीवर 4.56 किमी लांबीचा दुपदरी पूल - 645 कोटी.