Job Tendernama
टेंडर न्यूज

मोदींचे मोठे आश्वासन! दीड वर्षांत देणार तब्बल एवढ्या नोकऱ्या

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : वाढती महागाई (Inflation) आणि वाढलेल्या बेरोजगारीने (Unemployment) केंद्रातील मोदी सरकारच्या (Modi Government) चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे या दोन आघाड्यांवरील परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून विविध क्षेत्रांमधील रोजगारनिर्मिती वाढविण्यास सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. रोजगार निर्मितीत वेगाने वाढ व्हावी म्हणून विशेष योजना आखण्यावर सरकार विचार करत असल्याचे समजते.

आगामी दीड वर्षांत विविध पदांसाठीच्या सुमारे १० लाख जागा भरण्याची सूचना पंतप्रधान मोदी यांनी प्रशासनाला केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये दहा लाख सरकारी नोकऱ्या उपलब्ध होऊ शकणार आहेत, अशी माहिती पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून (PMO) देण्यात आली.

पुढील दहा वर्षांत केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये दहा लाख पदांची भरती करण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे, अशी माहिती पीएमओकडून ट्विटरवर देण्यात आली.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना दिलासा मिळणार आहे. कोरोनाचे संकट आणि लॉकडाउनमुळे सरकारी नोकर भरती थांबली होती. लॉकडाउन संपल्यानंतर काही प्रमाणात नोकरी भरतीला संथ गतीने सुरवात झाली आहे.