Varsha Tendernama
टेंडर न्यूज

'वर्षा', 'सागर'वर पाहुणचारासाठी 5 कोटींचे टेंडर; 2 ठेकेदार नियुक्त

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या 'वर्षा' या सरकारी निवासस्थानी, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या 'सागर' या सरकारी निवासस्थानी येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या पाहुणचाराची जबाबदारी राज्य सरकारने २ ठेकेदारांवर (Contractors) सोपविण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थातील खानपानासाठी सुमारे ३.५० कोटी रुपये, तर उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासाठी १.५० कोटींच्या खर्चाला मंजूरी देण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. वर्षा निवासस्थानी श्री सुखसागर हॉस्पिटॅलिटी, तर सागर निवासस्थानी मे. छत्रधारी कॅटरर्सला कंत्राट देण्यात आले आहे.

शिंदे सरकारने सरकारी निवासस्थानवरील पाहुणचार खर्चाला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षा बंगल्यासह सागर निवासस्थानवरील खर्चही आटोक्यात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन वेगवेगळ्या खाजगी कंत्राटदारांना वर्षा व सागर बंगल्यावरील खानपानाचे कंत्राट देण्यात आले आहेत. वर्षा निवासस्थानी श्री सुखसागर हॉस्पिटॅलिटी, तर सागर निवासस्थानी खानपान सेवा पुरवण्यासाठी मे. छत्रधारी कॅटरर्सला कंत्राट देण्यात आले आहे.

यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थातील खानपानासाठी अंदाजित खर्च अनुक्रमे ३.५० कोटी इतका असेल तर उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील खानपानासाठी १.५० कोटींचा खर्चाला मंजूरी देण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.

वर्षा आणि सागर या निवासस्थानी मान्यवर अतिथींसाठी खानपान सेवा पुरविणाऱ्या पुरवठादाराची नियुक्ती करण्यासाठी अंदाजित ५ कोटी रुपयांचे ई-टेंडर गेल्या वर्षी जाहीर करण्यात आले होते.

माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन संजय यादव यांनी याबाबत माहिती मागवली होती. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी खानपान सेवेसाठी १ जुलै २०२२ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या काळात दोन कोटी ३८ लाख ३४ हजार ९५८ रुपये खर्च झाल्याचे आढळून आले.

म्हणजेच दिवसाला सुमारे एक लाख ९३ हजार रुपयांचा खर्च मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवास्थानावर होत असल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून विरोधकांनी टीकाटिप्पणी केली होती. राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनापूर्वी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वर्षा बंगल्यावर चहामध्ये काय सोन्याचे पाणी घातले जायचे काय? असा संतप्त सवाल उपस्थित केला होता.

दरम्यान, नव्या करारानुसार कंत्राटदारांसाठी अटी आणि शर्थी लागू करण्यात आल्या आहेत. या अटीशर्थींचे उल्लघंन झाल्यास या कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, विविध करारात विविध पदार्थांचे दरही निश्चित करण्यात आले आहेत. हा करारनामा केल्यानंतर नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्क भरण्याची जबाबदारीदेखील कंत्राटदारावरच सोपविण्यात आली आहे.
पूर्ण

असे आहेत दर...

वेफर्स १० रुपये

मसाला चहा १४ रुपये

मसाला दूध १५ रुपये

कोथिंबीर वडी, समोसा, उकडीचे मोदक- १५ रुपये

साधारण शाकाहारी बुफे- १६० रुपये

विशेष शाकाहारी बुफे- ३२५ रुपये

साधारण मांसाहारी बुफे- १७५ रुपये