ST Tendernama
विदर्भ

एसटीवर का आली ताडपत्रीची 'चिकटपट्‍टी' वापरण्याची वेळ?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : कोरोनामुळे उत्पन्न घटलेल्या एसटीला (MSRTC) पै-पै वाचवण्यासाठी देशी जुगाड करावे लागत आहेत. गळक्या बसेसमधील पावसाच्या पाण्याची गळती रोखण्यासाठी ताडपत्रीच्या चिकटपट्‍ट्‍या चिकटवल्या जात आहेत.

पावसाळ्यात तुम्ही जर एसटीने प्रवास करीत असाल तर सोबत छत्रीसुद्धा बाळगावी लागते अशी परिस्थिती आहे. अनेक बसेसचे छप्पर सडलेले आहे. त्याला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे पाऊस आल्यास थेट प्रवाशांच्या अंगावर पाण्याचे थेंब टपकतात. एसटी महामंडळ मोठा खर्च करायला तयार नाही.

दुसरीकडे प्रवाशांची ओरड आणि गैरसोय होत आहे. अशा परिस्थितीत ताडपत्रीचा उपाय शोधून काढण्यात आला आहे. ज्या ठिकाणी गळती असेल तेथे तात्पुरते ‘पॅचेस’लाऊन काम भागविल्या जात आहे. पूर्वी स्टीकर सारखी पट्टी छताला चिकटविण्यात येत होती. त्यामुळे गळतीची तात्पुरती सोय होत होती. मात्र उन्हामुळे ‘पॅचेस’ तडकतात. त्यातून पुन्हा पाण्याची गळती सुरू होते. त्यामुळे आता ताडपत्रीच्या चिकटपट्‍ट्‍या शोधून काढण्यात आल्या आहेत.