Samruddhi Expressway Tendernama
विदर्भ

Samruddhi Expressway: गोंदिया जिल्ह्यासाठी Good News! 'या' 23 गावांतील जमिनीला येणार सोन्याचा भाव

टेंडरनामा ब्युरो

गोंदिया (Gondia) : गोंदिया जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी नागपूर ते गोंदिया द्रुतगती महामार्ग (समृद्धी महामार्ग) बांधकामाचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

याबाबत राज्यपालांच्या आदेशान्वये अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अनुरूप नागपूर-गोंदिया हा समृद्धी महामार्ग नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील 101 गावशिवारांतून जाणार आहे. यासाठी जवळपास 4 हजार गट क्रमांकांची जागाही अधिगृहित करण्यात येणार आहे. तिरोडा तालुक्याच्या मार्गाने गोंदियाला जोडणाऱ्या बालाघाट मार्गाशी जोडला जाणार आहे.

गोंदिया ते नागपूर या प्रवासासाठी सध्या असलेल्या मार्गाने तीन ते चार तास लागतात. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रवास सुखकर आणि कमी वेळेत व्हावा यासाठी नागपूर ते गोंदियाला समृद्धी महामार्गाने जोडण्यात येणार आहे. या मार्गावरून ताशी 160 किमी वेगाने प्रवास करणे शक्य होणार आहे. त्यामुळे चार तासांच्या प्रवासासाठी दोन ते अडीच तासच लागतील.

या द्रुतगती महामार्गाचे बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावर राज्यपालांकडून शिक्कामोर्तब झालेय असून, त्यांच्या आदेशान्वये अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. हा मार्ग तिरोडा तालुक्यातून गोंदियाला जोडला जाणार आहे. हा मार्ग नागपूर, भंडारा व गोंदिया या तीन जिल्ह्यांतील जवळपास 101 गावशिवारातून जाणार आहे.

प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेमध्ये अधिगृहित करण्यात आलेले गट क्र. व आवश्यक जमिनीचे क्षेत्रफळ नमूद करण्यात आले आहे. 208 पानांच्या अधिसूचनेत नागपूर ते गोंदिया प्रवेश नियंत्रित शीघ्र संचार, द्रुतगती महामार्ग म्हणून संबोधण्यात आले आहे. त्यामुळे या द्रुतगती मार्गाच्या बांधकामाला गती येणार आहे.

असा जाईल मार्ग...

नागपूर ते गोंदिया हा दुतग्रती मार्ग नागपूर जिल्ह्यातील नागपूर, उमरेड, कुही, मौदा, भंडारा जिल्ह्यातील भंडारा, मोहाडी, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा व गोंदिया तालुक्यातून जाणार आहे.

जिल्ह्यातील 33 गावांची जमीन होणार अधिग्रहित :

नागपूर-गोंदिया समृद्धी मार्गासाठी तिरोडा तालुक्यातील मनोरा, केसलवाडा, येडमाकोट, पांजरा, सरांडी, उमरी, धादरी, बेलाटी, कवलेवाडा, चिरेखनी, भुराटोला, पालडोंगरी, करटी बु., बेरडीपार, डब्बेटोला, सोनेगाव, नहस्टोला व गोंदिया तालुक्यातील बोदा, दवनीवाडा, पिपरटोला, देऊटोला, सोनपुरी, निलागोंदी, रतनारा, लोहारा, पांढराबोडी, लईटोला, लोधीटोला, नवाटोला, घिवारी, लोधीटोला, हलबीटोला व सावरी या 33 गावांतील जमिनी संपादित करण्यात येणार आहेत.