नागपूर (Nagpur) : अजनी कॅम्पसमध्ये अजनी रेल्वे ओव्हर ब्रीज (आरओबी) आता लवकरच बांधकाम सुरु होणार आहे, आता लवकरच ते प्रत्यक्षात येईल. केवळ विभागच नाही, तर मध्य रेल्वेच्या मुंबई मुख्यालयातूनही याला ग्रीन सिग्नल मिळाला आहे आणि पीडब्ल्यूडी विभागाची मान्यताही मिळाली आहे. केवळ मंत्रालयातून बांधकाम पत्राची प्रतीक्षा आहे. हे प्रत्यक्षात आणण्यासाठी महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर काम करीत आहे.
298 कोटी खर्च
अजनी आरओबी खूप जुना आणि जीर्ण अवस्थेत आला आहे. त्याखालून रोज शेकडो मुंबई लाईनच्या गाड्या येतात आणि वरून सुद्धा शेकडो वाहने येत-जात राहतात. काही अनुचित घटनेच्या भीतीने या पूलाची अनेकदा दुरुस्ती करण्यात आली. आता येथे नवीन पूल बांधण्यात येणार आहे. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून नवीन पूल बनने आवश्यक आहे. बऱ्याच काळापासून पूलाच्या नूतनीकरणाबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नव्हती. आताच्या अंदाजपत्रकात 298 कोटी खर्च करून पुलाचे निर्माण करण्यात येणार आहे. रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाने 21 नोव्हेंबर रोजी स्टोन इन्फ्रास्ट्रक्चर आणि ग्लोब सिव्हिल नावाच्या कंपनीकडे ही जबाबदारी दिली आहे. हे काम 40 महिन्यात पूर्ण होणार आहे. यासाठी 298 कोटी रुपये खर्च येणार आहे. डिझाईनला विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयानेच मान्यता दिलेली नव्हती. परिणामी काम बंद पडले होते. आता केवळ डीआरएम कार्यालयातूनच नाही तर त्याला मध्य रेल्वेच्या मुख्यालयाची परवानगीही मिळाली आहे. अशा स्थितीत त्याचे काम प्रत्यक्षात येण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
ग्रीन सिग्नल मिळाला
रेल्वे मुख्यालयाकडून अजनी आरओबीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती डॉ. टेंभुर्णे, जीजीएम, महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी दिली आहे.
अजनी पुलासाठी 27 दुकाने तोडली
अजनीमध्ये प्रस्तावित नवीन पुलाचे निर्माण करण्यासाठी रेल्वे कॉलनीतील 27 दुकाने जमीनदोस्त करण्यात आली आहे. ही दुकाने लीजवर देण्यात आली होती. आता या पूलाच्या निर्माण कार्यासाठी सगळेच रस्ते मोकळे झाले आहे, त्यामुळे लवकरच पूलाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे.