Railway Tendernama
विदर्भ

नागपूर-वर्धा तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे लाईनचा मार्ग झाला मोकळा

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूर-वर्धा तिसऱ्या, चौथ्या मार्गाचा रस्ता आणखी मोकळा झाला आहे. या मार्गासाठी आवश्यक भूसंपादन नुकतेच पूर्ण झाले आहे. अशा परिस्थितीत हा मार्ग प्रत्यक्षात आणण्याचा वेगही वाढला आहे. सद्यस्थितीत 61 किलोमीटरचे काम जवळपास पूर्ण झाले असून, त्यात काही सेक्शन सुरूही झाले आहेत. अशा स्थितीत नागपूर रेल्वे स्थानकाला लवकरच संपूर्ण मार्गिका सुरू करून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

आउटरवर उभी राहते गाडी

नागपूर रेल्वे स्टेशन हे जंक्शन आहे. येथून तीन दिशामध्ये गाड्या धावतात. ज्यात मुंबई, दिल्ली आणि हावडा मार्गांचा समावेश आहे. सध्याच्या परिस्थितीत स्टेशनवरून दररोज 125 एक्स्प्रेस, पॅसेंजर आणि 250 मालगाड्या ये-जा करतात. स्थानकावर एक्स्प्रेस गाड्यांच्या प्रचंड भारामुळे  मालगाड्या अनेकदा बाहेर सिग्नलवर थांबवल्या जातात. काही वेळाC एक्स्प्रेस गाड्यांनाही बराच वेळ बाहेरच्या बाजूला उभं राहावं लागतं. त्यामुळे एकीकडे प्रवाशांची गैरसोय होत आहे, तर दुसरीकडे रेल्वेचा महसूल बुडत आहे.

नागपूर स्थानकाला भेडसावणाऱ्या या अडचणी लक्षात घेऊन गेल्या 5 वर्षांपूर्वी नागपूर ते सेवाग्राम मुंबई मार्गावर तृतीय व चतुर्थ श्रेणीची घोषणा करण्यात आली. त्याचे कामही सुरू झाले, परंतु ही लाईन प्रत्यक्षात आणण्यात सर्वात मोठी अडचण भूसंपादनाची होती. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीतून रेल्वेमार्ग जाणार होता. ही लाईन प्रत्यक्षात आणण्यासाठी 36 हेक्टर जमीन संपादित करणे आवश्यक होते, ते नुकतेच पूर्ण झाले आहे. अशा स्थितीत लवकर प्रत्यक्षात येण्याची आशा बळावली आहे.

आतापर्यंत 78.71 किलोमीटर मार्गाचा काम झाला आहे. या कामावर 540.02 कोटी खर्च केले जात आहे तर 36 हेक्टर जमीन भूसंपादन करायची आहे. बुटीबोरी ते बोरखेडी आणि सिंदी  19.33 किमी काम पूर्ण झाला आहे. अजनी ते बुटीबोरी आणि सिंदी ते सेलू या 42 किलोमीटर चे काम जवळपास पूर्ण झाले आहे. नागपूर ते अजनी आणि सेलू रोड ते वर्धा दरम्यान 16.97 किमीचे काम प्रगतीपथावर आहे.