Nagpur Metro MahaMetro Tendernama
विदर्भ

Nagpur Metro : मेट्रो फेज-2चे 'या' कंपनीला मिळाले टेंडर

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : देशात 905 किलोमीटर लांबीचे मेट्रो रेल्वेचे जाळे पसरले आहे. महाराष्ट्रात मुंबई, नागपूर आणि पुणे शहरांत मेट्रो रेल्वेचा विस्तार होत आहे. त्यात विशेषतः नागपूर शहरात आतापर्यंत 40 किलोमीटरचे मेट्रो रेल्वेचे जाळे तयार झाले असून, मेट्रोचा दुसरा टप्पा डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे. दुसरा टप्पा 43 किलोमीटरचा असणार आहे. या कामासाठी टेंडर निघाले असून रेल विकास निगम लिमिटेड ही कंपनी नागपूर मेट्रो रेल फेज-2 चे काम करीत आहे. 

कामठी रोडवर वायडक्टचे काम केले जात आहे. या अंतर्गत पिलर तयार करण्याचे काम रेल विकास निगम लिमिटेड या कंपनी कडून केले जात आहे.  6.92 किलोमीटर च्या आत काम सुरु आहे. तर या कामाचे टेंडर 394 कोटी 89 लक्ष 84 हजार 782 मध्ये काढले गेले आहे. सोबतच नागपूर मेट्रो रेल फेज - 2 च्या अंतर्गत 6 मेट्रो स्टेशन च्या कामाचे सुद्धा टेंडर काढण्यात आले आहे. 256 कोटी 19 लक्ष 87 हजार 814 मध्ये या कामाचे टेंडर रेल विकास निगम लिमिटेड या कंपनीलाच देण्यात आले आहे. यात सहा मेट्रो स्टेशन चे बांधकाम करण्यात येणार आहे. ज्यात इकोपार्क, फॉर्मेशन अर्थवर्क, बाउंड्री वॉल और रिटेनिंग वॉल।   एलिवेटेड मेट्रो ट्रैक सपोर्टिंग स्ट्रक्चर चे काम केले जात आहे. 

डिजाइन कंसल्टेंसी सर्विसेजला मिळाले टेंडर : 

मेट्रोच्या पिलरचे सुशोभीकरण करण्याचे टेंडर डिजाइन कंसल्टेंसी सर्विसेज ला 3 कोटी 97 लक्ष 50 हजार मध्ये मिळाले आहे. या कंपनी कडून पिलर वर डिजाइन काढण्याचे काम केले जात आहे. नागपूर मेट्रो रेल फेज 2 नागपूरच्या जवळच्या शहरांना जोडेल आणि या भागात राहणाऱ्या 10 लाखांहून अधिक लोकांना याचा मोठा फायदा होईल. हे काम पूर्ण झाल्यानंतर नागपूर मेट्रो प्रकल्पाची एकूण लांबी 82 किमी असेल. कन्हान मार्ग कामठी मधून जातो, जे एक मोठे शहर आहे आणि हजारो रहिवासी नोकरीआणि शिक्षणासाठी नागपूरला येतात. ते मेट्रोचा वापर करून नागपूरच्या कानाकोपऱ्यात जलद पोहोचू शकतील. वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) च्या अनेक कोळसा खाणी कन्हानजवळ आहेत.

बुटीबोरी ही नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असून या वसाहतीत हजारो नागपुरी काम करतात. बुटीबोरीमध्ये सुमारे 750 युनिट्स आहेत, ज्यात सुमारे 50,000 लोकांना रोजगार आहे. मेट्रो अश्या लोकांना जलद प्रवासाची सुविधा देईल. हिंगणा हे नागपूरला लागून असलेले झपाट्याने विकसित होणारे शहर आहे. कापसी येथे औद्योगिक वसाहत असून ते वाहतूक केंद्र आहे. 2 टप्प्यांत एकत्रितपणे 15,388 कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. नागपूर मेट्रोचा टप्पा-२ कार्यान्वित झाल्यानंतर प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे. दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर 2 टप्प्यातील एकूण प्रवासी संख्या दररोज 5.5 लाख असणे अपेक्षित आहे. हे 2031 मध्ये 6.3 लाख आणि 2041 मध्ये 7.7 लाखांपर्यंत वाढण्याची माहितीआहे.