नागपूर (Nagpur) : पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढण्यात आलेल्या टेंडरमध्ये अनियमितता व ग़ैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नेत्यांचा संगनमत जवळच्या लोकांना टेंडर देऊन दिसून आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नेता मंडळी यांनी आपसात संगनमत करून 300 कोटींची कामे आपल्याच जवळच्या ठेकेदारांना दिल्याची माहिती समोर आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग (विशेष प्रकल्प) नागपूर यांच्या कार्यालयाकडून केलेल्या टेंडर प्रक्रियेमध्ये अनियमीतता व गैरव्यवहार दिसून येत असून सर्व कामे रद्द करुन, पुनः निविदा प्रक्रिया राबविण्याची मागणी कांग्रेस नेते व पंचायत समिति रामटेक चे पूर्व उपसभापती उदयसिंग उर्फ गज्जू यादव यांनी केली आहे. 18 ऑगस्ट आणि 21 ऑगस्ट 2023 ला वर्तमानपत्रात जाहिरात देऊन एकूण 300 कोटी रक्कमेच्या कामांची खुले टेंडर मागविण्यात आली. यात 300 कोटींच्या 70 वेगवेगळ्या कामांचा समावेश आहे.
सोबतच तृतीय टेंडर दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी उघडण्यात येणार आहे. परंतू कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर यांच्या कार्यालयाकडून टेंडर कंत्राटदार व स्थानिक नेता यांचेशी संगनमत करून 300 कोटी रुपयांची एकूण 70 कामे आपआपसामध्ये सोयीनुसार वाटून घेतली आहेत. सदर टेंडर प्रक्रियेमध्ये होणाऱ्या अनियमिततेची माहिती मुख्य अभियंता व अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नागपूर यांना असुनसुद्धा ह्या गैरव्यवहारात यांचा छुपा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारपुस केले असता त्यांनी या बाबतीत मिळालेली माहिती ही खोटी असल्याचे सांगितले. आणि या प्रकरणातुन आपले हात झटकले.
मागील 15 वर्षांचा कार्यकाळात कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (विशेष प्रकल्प ) नागपूर यांच्या कार्यालयामार्फत झालेल्या निविदा ह्या 20 ते 35 टक्के कमी दरापर्यंत भरलेल्या होत्या. ह्यात विशेष म्हणजे एकाच अधिकाऱ्यांच्या मर्जीच्या कंत्राटदाराने जास्त प्रमाणात कामे मिळवून एकदम निकृष्ट दर्जाची गुणवत्ताहीन कामे केली आहे. मागील 15 वर्षात झालेले कोणकोणत्या कंत्राटदाराने कोणकोणती कामे आणि कोणत्या ठिकाणी केली ह्याचे विशिष्ट अंकेक्षण (स्पेशल ऑडीट) केले असता आणि कामांचे दोष दायीत्व कालावधी तपासली असता अनियमितता दिसून येईल. असा दावा काँग्रेस नेते गज्जू यादव यांनी केला आहे.
संदर्भीय ई-टेंडर सुचना क्रमांक 20 ते 31/2023-24 (एकूण 11 निविदा सुचना) मधील 70 कामांची किंमत 300 कोटी रुपये असून सार्वजनिक बांधकाम विभाग (विशेष प्रकल्प) नागपूर ह्यांनी यावेळी कंत्राटदारांशी परस्पर संगनमत केल्यामुळे 0 ते 5 टक्केच्या आत सर्व कामांच्या निविदा भरण्यात आलेल्या आहे. इतक्या कमी दरात नागपूर विभागात कंत्राटदारांनी टेंडर भरणे शक्यच नाही. टेंडरमध्ये दर्शविलेली कामे कोणत्या कंत्राटदारांना कोणती कामे वाटप केली असल्याची त्या-त्या एजेंसीच्या नावांची यादीही निविदा उघडण्यापूर्वीच समोर आल्याची माहिती आहे. या प्रकारणात चौकशी केली गेली असता प्रकाशित करण्यात आलेल्या संदर्भीय सर्व निविदा प्रक्रिया पारदर्शक नसुन ह्यात गैरव्यवहार झाल्याचे दिसून येईल. विशेष म्हणजे 300 कोटींची कामे ही पारशिवनी, मौदा आणि रामटेक या तालुक्यातिल नेत्यांच्या जवळच्या ठेकेदारांना देण्यात आल्याची गोपनीय माहिती आहे.