Nitin Gadkari Tendernama
विदर्भ

Good News : पूर्व नागपूरमध्ये दोन अंडरब्रिज होणार; गडकरींनी दिले 40 कोटी

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : पूर्व नागपूरमधील रेल्वे गाड्यांच्या आवगमानामुळे होणारा खोळंबा आणि वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी दोन भूमिगत मार्ग तयार करण्यात येणार आहेत. केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी यासाठी 40 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

शांतीनगर कॉलनी रेल्वे लाईन ते किनखेडे लेआउट आणि डिप्टी सिग्नल ब्रॉडगेज लाईन ते भंडारा रोड येथे दोन अंडरब्रिज निर्माण करण्यात येणार आहे. या दोन्ही अंडरब्रिजमुळे भंडारा रोड ते डिप्टी सिग्नल व शांतीनगर सरळ जाता येईल तसेच शांतीनगर कॉलनी पासून अंडरब्रिज उत्तर नागपूरला जोडणार असून हे दोन्ही ब्रिज नागरिकांसाठी वरदान ठरणार आहे. या दोन्ही कामाचा महारेल कंपनीने डीपीआर तयार केले असून लवकरच या कामाची सुरुवात पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गुंठेवारी अंतर्गत विकास शुल्क 56 रुपये प्रती चौरस फूट घेण्याचा आदेश काढला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारने त्यात दर तीन पट वाढ केली होती. तो 168 रुपये केला होता. राज्यात महायुतीचे सरकार येताच हा आदेश रद्द करण्यात आला. सुधार प्रन्यासच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत 56 रुपये प्रती चौरस फूट प्रमाणे विकास शुल्क घेण्याचा निर्णय घेत आहे.

हॉस्पिटलला सावरकरांचे नाव : 

राज्य सरकारच्यावतीने वाठोडा येथे 300 खाटांचे हॉस्पिटल उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी 187 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. त्यास मान्यतासुद्धा देण्यात आली आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्या वतीने आता टेंडर प्रक्रियेवर काम सुरू करण्यात आले आहे. या हॉस्पिटलला स्वातंत्रवीर सावरकर यांचे नाव देण्याचा निर्णय प्रन्यासच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.