Railway Tendernama
विदर्भ

नागपूर-वर्धा तिसरी-चौथी लाईन 34 किमी पूर्ण; आतापर्यंत 1000 कोटींहून अधिक झाले खर्च

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूर वर्धा तिसरी लाईन ची खूप वर्षापूर्वी घोषणा केली गेली होती. कालांतराने गरजेनुसार येथे चौथी लाईनही घोषित करण्यात आली. सध्या या 78 किमी मार्गाचे 34 किमीचे काम पूर्ण झाले आहे. अजून 44 किमीचे काम बाकी आहे. जे लवकरच पूर्ण होणार असून नागपूर ते वर्धा या दोन नवीन अतिरिक्त लाईन बनविण्यात येणार आहेत जे प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

नागपूर ते वर्धा दरम्यान दररोज मोठ्या संख्येने गाड्या धावतात. अशा परिस्थितीत येथे दोन लाईन पुरेशा नाहीत. त्यामुळे तिसरी आणि चौथी लाईन बनविण्याची घोषणा करण्यात आली आहे. आतापर्यंत या मार्गावर 1000 कोटींहून अधिक खर्च झाले आहे.

रेल्वे लाईन सुरु झाल्यास होणार सुविधा : 

नागपूर ते वर्धा आणि वर्धा ते नागपूर हज़ारोंच्या संख्येत प्रवाशी दररोज प्रवास करतात. लोकांची वाढती गर्दी बघता लवकरात लवकर या रेल्वे लाईन चे काम करण्यात येत आहे. नागपूर-वर्धा तिसरी-चौथी लाईन पूर्ण झाल्याने रेल्वे चा महसूल तर वाढणारच पण प्रवाश्यांची सुद्धा सोय होईल. कमी वेळेत प्रवासी नागपूर ते वर्धा ते नागपूर पोहचु शकेल. 

सध्याची परिस्थिती : 

खापरी - सिंदी - 34.59 किमी, सिंदी - सेलू रोड, खापरी अजनीचे काम पूर्ण झाले आहे. सेलू रोड ते वर्धा आणि अजनी ते नागपूर मार्गाचे काम सुरू झाले आहे.

जमिनीची स्थिती : 

भूसंपादन आवश्यक - 38.858 हेक्टर

भूसंपादन पूर्ण - 38.818 हेक्टर (99.50%)

भूसंपादन शिल्लक - 0.04 हेक्टर

रेल्वे लाईन : 

लाईनची लांबी 78.70 किमी 

कमिशनची लांबी 34.59 किमी

उर्वरित काम- 44.11 किमी

 खर्च रु. 1177.97 कोटी

आतापर्यंतचा खर्च – 1035.92 कोटी