Nagpur Tendernama
विदर्भ

Nagpur News : 177 कोटींची विकासकामे मार्गी; टेंडर प्रक्रिया पूर्ण

टेंडरनामा ब्युरो

Nagpur News नागपूर : 177.64 कोटींच्या कामांना निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील 72 ठिकाणी नदी, नाल्यांच्या भिंती तुटल्या होत्या. तसेच 48 रस्ते देखील खराब झाले होते.

या मूलभूत सुविधा पूर्वस्थितीत आणण्याकरिता नागपूर महानगरपालिका प्रशासनाद्वारे विभागीय आयुक्तांमार्फत सरकारकडे निधीचा प्रस्ताव सादर केला होता. विभागीय आयुक्तांनी सरकारला सादर केलेल्या प्रस्तावावर राज्य सरकारने नागपूरसाठी विशेष आर्थिक पॅकेज जारी केले होते. त्या अनुषंगाने मनपाद्वारे 72 नदी, नाल्यांच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी 151.51 कोटी व 48 रस्त्यांसाठी 26.13 कोटी अशा 120 कामांच्या 177.64  कोटींची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र, निवडणूक आचारसंहिता लागल्याने उर्वरित कामे सुरू होऊ शकली नाही.

15 जूनपर्यंत नदीनाल्यांची सफाई होणार : 

शहरातील नाग नदीसह पिवळी आणि पोहरा या नद्यांच्या स्वच्छतेचे कार्य प्रगतिपथावर आहे. पावसाळ्यापूर्वी प्रमुख तीनही नद्यांच्या स्वच्छतेचे कार्य पूर्ण होणे आवश्यक असून, त्यादृष्टीने गती वाढविण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार 15 जूनपूर्वी सर्व नदीचे स्वछतेचे कार्य मनपातर्फे पूर्ण करण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल करून निवडणूक आयोगाने नागपूर शहरात पावसाळ्यापूर्वी करावायची उपाययोजना व विकास कामे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे 177.64 कोटींची 120 कामे लगेच सुरू करण्यात येणार आहेत. आचारसंहितेमुळे ही सर्व कामे थांबली होती.

निवडणूक आयोगाकडून नागपूर महापालिकेला कामे सुरू करण्याची परवानगी देणारे पत्र मंगळवारी राज्याच्या नगरविकास विभागाला दिले आहे. अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या भागांतील मुलभूत सुविधा पूर्वस्थितीत आणण्याकरिता नदीच्या संरक्षक भिंती व रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी परवानगी प्राप्त झाली आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

नागपूर शहरात गेल्या वर्षी 22 सप्टेंबर 2023 च्या मध्यरात्री आलेल्या अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या भागांतील मुलभूत सुविधा पूर्वस्थितीत आणण्याकरिता येणाऱ्या खर्चाला यापूर्वी महाराष्ट्र सरकारद्वारा प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती.

अतिवृष्टीमुळे शहरातील 72 ठिकाणी नदी, नाल्यांच्या भिंती तुटल्या होत्या. तसेच 48 विविध रस्ते देखील खराब झाले होते. याकरिता राज्य सरकारने नागपूरसाठी विशेष आर्थिक पॅकेज जारी केले होते. त्यातून मनपाद्वारे 72 नदी, नाल्यांच्या 151.51 कोटी व 48 रस्ते यांच्या 26.13 कोटी अशा 120 कामांच्या 177.64 कोटींची टेंडर प्रक्रिया पूर्ण केली होती.

शहरातील नाग नदीसह पिवळी आणि पोहरा या नद्यांच्या स्वच्छतेचे कार्य प्रगतीपथावर आहे. पावसाळ्यापूर्वी प्रमुख तिनही नद्यांच्या स्वच्छतेचे कार्य पूर्ण होणे आवश्यक असून त्यादृष्टीने गती वाढविण्याचे निर्देश अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.