NMC Tendernama
विदर्भ

Nagpur : महापालिकेचा Green Signal; 207 कोटींच्या 'या' कमर्शिअल कॉम्प्लेक्सच्या बांधकामाचे निघाले Tender

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूर महानगरपालिकेच्या मालकीच्या गांधीबाग येथील जागेवर जीर्णावस्थेत असलेल्या सोख्ता भवन इमारतीच्या जागेवर डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट ॲण्ड सेल (डीबीएफएसएम) तत्वावर कमर्शिअल कॉम्प्लेक्स बांधकाम प्रकल्पास नागपूर महानगरपालिकेद्वारे मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. तर या प्रकल्पाच्या टेंडर प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासन प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम अन्वये सोख्ता भवन इमारत पाडून येथील 6353 चौरस मीटर जागा नागरी सुविधा केंद्र व व्यापारी संकुल या वापराकरीता महाराष्ट्र सरकारच्या नगर वकास विभागाद्वारे मान्यता प्रदान करण्यात आली होती. त्यानुसार या प्रकल्पाचे सल्लागार व वास्तुशिल्पकार मे. डिझाईन सेल यांनी या प्रकल्पाचे आराखडे तयार करून नगर रचना विभागाची मान्यता घेतलेली आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील पीपीपी/डीबीएफओएस प्रकल्पाच्या छाननी समितीने या प्रकल्पाच्या अहवालास मान्यता दिलेली आहे.

अशा असणार सुविधा? 

एकूण 28922.20 चौरस मीटर क्षेत्रफळात प्रकल्पाचे बांधकाम होणार आहे. प्रकल्पामध्ये तीन तळघर पार्किंगचे नियोजन केले जाणार आहेत. यामध्ये 283 कार, 566 स्कूटर आणि 566 सायकल पार्कींगची क्षमता असेल. या प्रकल्पामध्ये सातव्या माळ्यावर 600 व्यक्ती क्षमतचे सामाजिक सभागृहाचे बांधकाम नियोजित आहे. या प्रकल्पाची बांधकाम किंमत 207.98 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. प्रकल्प बांधकामाचा कालावधी 3 वर्षे निश्चित करण्यात आला आहे. 

या प्रकल्पामधून मनपास देय होणारी रक्कम कमीत कमी 224 कोटी ही 4 वर्षात पूर्वनियोजित वार्षिक टक्केवारीनुसार विकासकाने मनपास जमा करावयाची आहे. त्यानुसार पहिल्या वर्षी 15 टक्के तर दुस-या वर्षी 30 टक्के आणि तिस-या वर्षी 20 टक्के आणि चवथ्या वर्षी 25 टक्के अशा टक्केवारीनुसार मनपास रक्कम दिली जाणार आहे. विकासकाला प्रकल्पातील विक्री घटक विकण्याकरीता 5 वर्षाचा कालावधी देण्यात आलेला आहे.

6353 चौरस मीटर जागेत प्रकल्प, पार्कींगसाठी तीन तळघर, सामाजिक सभागृह बांधण्यात येणार आहे. गांधीबाग या परिसरात नेहमीच गर्दी असते. हे प्रकल्प पूर्ण झाल्यास लोकांना पार्किंगसाठी जागा मिळेल तर, नागरिकांना अनेक कामांसाठी सोई उपलब्ध होतील.