Nagpur Tendernama
विदर्भ

Nagpur : G-20 साठी रस्त्याच्या बांधकामावर होतोय 27.15 कोटी खर्च

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : 'जी-20' (G-20) आंतरराष्ट्रीय बैठक नागपुरात होणार असून, यानिमित्त शहरात ठिकठिकाणी रस्त्याचे बांधकाम केले जात आहे. आता नागपुरकरांना जी-20 बैठकीनिमित्त चांगल्या रस्त्याचे सुख भेटणार आहेत. काही ठिकाणी रस्त्यात अनेक खड्डे बनले असून, त्यामुळे नागपुरकरांना येण्याजाण्यासाठी खूप त्रास व्हायचा आणि कित्येक महिने रस्ता दुरुस्तीचे काम सुरु असायचे. मात्र, शहरात होत असलेल्या जी-20 बैठकनिमित्त नागपुरकरांना या त्रासापासून मुक्तता मिळेल. कारण येत्या 15-20 दिवसांत शहरात ठिकठिकाणी सुरु असलेले रस्त्याचे बांधकाम पूर्ण केले जाईल.

रस्त्याच्या बांधकामावर महापालिकेचा पीडब्ल्यूडी विभाग 27.15 कोटी रुपये खर्च करत आहेत. 27.15 कोटी निधी हा सरकारकडून आलेला पहिल्या टप्प्याचा निधी आहे. ज्यात 18 कामांचे टेंडर पीडब्ल्यूडीने काढले आहेत आणि 15 कामांचे वर्कऑर्डर निघाले आहेत. ज्यापैकी 1 काम पूर्ण झाले आहेत. जी-20 बैठकीसाठी एयरपोर्ट रस्ता, लिबर्टी टॉकीज समोरचा रस्ता, फुटाळा-वायुसेना नगर रस्त्याचे बांधकाम आणि दुरुस्तीचे काम केले जात आहेत. हे काम लवकरच पूर्ण करू अशी माहिती महापालिकेचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांनी दिली.

यासोबत महापालिका स्वत:च्या निधीतून नागपूर शहरात ठिकठिकाणी रस्त्याचे बांधकाम आणि दुरुस्तीचे काम करत आहे. त्यासाठी महापालिकेने 119 कामासाठी 20.91 कोटीचे टेंडर काढले आहेत. ज्यापैकी 116 कमांचे वर्कऑर्डर निघाले असून, 32 पूर्ण झालेले आहेत आणि 82 बांधकाम हे पूर्णत्वास आहे. जी-20 या आंतरराष्ट्रीय बैठकीसाठी तब्बल 50 कोटी महापालिका शहराच्या सौंदर्यीकरणावर खर्च करत आहे. ज्यामध्ये पेंटिंग, विद्युतीकरण, रस्ते बांधकाम असे अनेक कामे सुरु आहेत. ज्यापैकी एयरपोर्ट रोड ते प्राइड होटेल ते ली मेरेडियन हॉटेल रोडपर्यंत आणि शहराच्या मुख्य चौकात विद्युतीकरणाचे काम केले जात आहे. ज्यावर तब्बल 21.23 कोटी खर्च केले जात आहेत. सध्या सगळीकडे कामे सुरु आहेत आणि ही कामे लवकरच पूर्ण केली जातील कारण येणाऱ्या 21 आणि 22 मार्चला शहरात 'जी-20' ची आंतरराष्ट्रीय बैठक होणार आहे. आणि या बैठकीला फक्त एक महिना उरला आहे.