नागपूर (Nagpur) : नागपूर शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासोबतच सिग्नल व्यवस्था एकाचवेळी कार्यान्वीत होण्यासाठी (सिंक्रोनाईस) 197 कोटी 63 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून येत्या जून अखेरपर्यंत वाहतूक सुरळीत करण्याची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या होत्या. या अनुषंगाने नागपूर महानगर पालिका ने IITM (इंटिलिजेंट इंटीग्रेटेड ट्रैफिक मैनेजमेंट ) साठी 164 कोटीचे टेंडर 17 मे 2024 ला काढले. या कामासाठी टेंडर भरण्याची शेवटचा दिनांक 6 जून 2024 आहे. तरी काम करणाऱ्या इच्छुक कंपनीला नागपूर मनपा तर्फे ऑनलाइन टेंडर भरण्याचे आव्हान करण्यात आले आहे. 5 वर्षासाठी कामाचे टेंडर देण्यात येईल. आणि येणाऱ्या 10 जून 2024 ला दुपारी 3 वाजता हे टेंडर उघडले जाईल.
इंटिलिजेंट इंटीग्रेटेड ट्रैफिक मैनेजमेंट सिस्टीम मुळे संपूर्ण शहराचे ट्रैफिक नियंत्रित केले जाईल. एकाचवेळी अनेक चौकातील ट्रैफिक सिग्नल वर नियंत्रण ठेवता येईल. तर या इंटिलिजेंट इंटीग्रेटेड ट्रैफिक मैनेजमेंट सिस्टीम मुळे वाहने देखील स्कैन केले जाईल. या अंतर्गत ट्रॉफिक सिग्नलच्या सिंक्रोनायझेशनचा 197 कोटी 63 लक्ष रुपयाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून येत्या जून पासून टेंडर उघडताच कामाला सुरुवात होणार आहे. शहरातील वाहतूक शाखेचे आधुनिकीकरण व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यावश्यक अत्याधुनिक साधने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यामध्ये दहा टोइंग व्हॅन, पाच अतिरिक्त इंटरसेफ्टर वाहनांचा समावेश आहे. या कामासाठी नागपूर महापालिकेला 194 कोटी मिळाला आहे. त्यातून 164 कोटीचे टेंडर काढण्यात आले आहे. उर्वरित निधी इतर कामांमध्ये उपयोग केले जाईल.
24 अपघात प्रवण स्थळांची विशेष दुरुस्ती :
नागपूर शहर व परिसरात 23 अपघात प्रवण स्थळ निश्चित करण्यात आले असून भविष्यात अपघात होणार नाही यादृष्टिने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. महानगरपालिकेतर्फे 15 अपघात प्रवण स्थळांवर गतीरोधक, झेब्रा क्रॉसिंग, सूचना फलक, सिग्नल व्यवस्था, अतिक्रमण निर्मुलन तसेच डिव्हायडर दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. अपघात प्रवण स्थळांवर होणारे अपघात टाळण्यासाठी या ठिकाणांवर यापूर्वी झालेले अपघात, जीवीत हानी तसेच अपघात टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना केल्या जाणार आहे. रस्त्यावर पार्कीगमुळे होणारा वाहतूक अडथळा दूर करण्यासाठी शहरात 75 रस्त्यांची निवडकरुन ऑन स्ट्रीट पार्कीगची सुविधा निर्माण करण्यात येत आहे. शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पार्कींगसाठी विविध भागात जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यासोबतच बळकस चौक, नेताजी मार्केट, महात्मा फुले भाजी बाजार आदी ठिकाणी पार्कींगची सुविधा तसेच वाहन तळासाठी राखीव असलेल्या जागेचा शोध घेतले जात आहे.