नागपूर (Nagpur) : आमदार निवासामध्ये आमदार कमी आणि त्यांचे समर्थक जास्त राहतात. आमदारांच्या अल्प मुक्कामामागील एक कारण म्हणजे आमदार निवासातील खोल्या हायटेक नाहीत. आमदारांना प्रथमदर्शनी आवडलेल्या अशा हायटेक खोल्या बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) काम सुरू केले आहे.
आमदार निवास इमारत क्र. 2 तळमजला आणि पहिल्या मजल्यावर सॅम्पल रूम तयार केल्या आहेत, ज्या पंचतारांकित हॉटेलच्या खोल्यांपेक्षा कमी नाहीत.
हायटेक सुविधा
सॅम्पल रूम खोली क्रमांक 39 आणि खोली क्रमांक 145 मध्ये बनवल्या आहेत. आमदारांसाठी बांधलेल्या इतर खोल्यांपेक्षा या खोल्या चकाचक आहेत. या कक्षात आमदार, समर्थक व पाहुण्यांच्या राहण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. आमदाराबद्दल बोलायचे झाले तर एसी, गरम पाणी, हायटेक टॉयलेट, बाथरूम, किचन याशिवाय दोन बेड असतील. खोली पूर्णपणे सुसज्ज आहे आणि वीज व्यवस्था हायटेक आहे. छतावर लावलेले पीओपी दिवे खोलीच्या सौंदर्यात भर घालतात.
183 रूम हायटेक करण्याचा प्रस्ताव
विधान परिषदच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी आमदारांसाठी बनवलेल्या या सॅम्पल रूम पाहिल्या. त्यांना त्या आवडल्या असून, त्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्याच्या सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या. त्यानंतर लगेच या संबंधित प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे.
23 कोटींचा खर्च
आमदार निवासातिल इमारत क्रमांक 2 मध्ये 183 खोल्या आहेत. ते हायटेक आणि पंचतारांकित हॉटेलप्रमाणे बनविन्यासाठी कमीत कमी 23 कोटींचा खर्च लागेल. जीएसटी पकडून प्रत्येक खोलीमागे 20 ते 25 लाख रुपये खर्च येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यात लॉबी रेनोव्हेशन सोबत खोल्या हायटेक आणि पंचतारांकित हॉटेल प्रमाणे बनविल्या जातील. येणाऱ्या अर्थसंकल्पी सत्रात या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची आशा आहे.